शिराळा,ता.११ :करमाळे (ता.शिराळा) येथील काळवट शेतात असणाऱ्या विहिरीत पडून अंदाजे सात महिन्याच्या मादी जातीच्या बिबट्याच्या बछाड्याचा मृत्यू झाला.ही घटना आज सकाळी सव्वा दहा वाजता उघडकीस आली.
याबाबत घटनास्थळी व वन विभाग यांच्या कडून मिळालेली माहिती अशी की ,करमाळे येथील काळवट शेतात उत्तम आनंदा पाटील यांची विहीर आहे.सकाळी सव्वा दहाच्या सुमारास उत्तम पाटील यांचे चुलत भाऊ नागनाथ शामराव पाटील हे शेतात पाणी पाजण्यासाठी गेले होते.त्यावेळी मोटर सुरु करण्यासाठी विहिरीजवळ गेले असता त्यांना विहिरीत बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. याबाबत नागनाथ पाटील यांनी सरपंच सचिन पाटील यांना माहिती दिली.सरपंच सचिन पाटील यांनी वन विभागास कळविले.वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी ,वनपाल अनिल वाझे,वनरक्षक स्वाती कोकरे,दत्तात्रय शिंदे,प्राणी मित्र सुशीलकुमार गायकवाड,वन मजूर सचिन पाटील , वैभव गुरव,दादासो शेटके,आदिक शेटके, संतोष कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी प्राणीमित्र सुशीलकुमार गायकवाड यांनी दोरीला कॅॅरेट बांधून वर काढण्याचा पर्यंत केला.मात्र कॅॅरेट पेक्षा बछाड्याचा आकार मोठा असल्याने समतोल साधत नसल्याने वरती काढण्यास अडचण येत होत्या.त्यामुळे गायकवाड हे दोरच्या सहायाने खाली विहिरीत उतरले त्यांनी बछाड्यास शेपटीच्या सहायाने कॅॅरेट मध्ये घालून वरती काढले. त्यानंतर पंचनामा करण्यात आला.पशुधन विकास अधिकारी डॉ.शुभांगी अरगडे यांनी शवविच्छेदन केले. शिराळा येथील वन विभागाच्या कार्यालयात आणून त्याचे दहन करण्यात आले. घटनास्थळी विहिरी जवळ बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत.त्यामुळे मादी बिबट्याचा बछड्यासह या परिसरात वावर असल्याचे आढळून आले आहे. या बिबट्याच बंदोबस्त करावा अशी करमाळे ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
0 Comments