सकाळ’च्या शिवाजीराव चौगुले यांना पुरस्कार
वारणा महाविद्यालयातर्फे साहित्यप्राज्ञ स्व. बाजीराव बाळाजी पाटील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात येतो. ‘सकाळ’चे शिराळा तालुका प्रतिनिधी शिवाजीराव चौगुले आणि कोडोली येथील पत्रकार संजय भोसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २०० पत्रकारांचा तसेच सांगली जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
असा झाला पत्रकार सन्मान सोहळा
ऐतवडे खुर्द, ता. ११ :पदापेक्षा लोकांच्यात आपली असणारी पत महत्वाची आहे.मंत्री पदापेक्षा सर्व सामान्य जनतेची जंत्री आपल्या पाठीशी आशीर्वाद घेवून असते त्यावेळी जगातील सर्व पदे छोटी होतात. मिळालेल्या पदाच्या माध्यमातून लोक हिताला महत्व दिले.पत्रकारांचे महत्व अनन्यसाधारण आहे.त्यांच्या व्यथा आणि अडचणी मला माहित आहेत.पत्रकारांच्या टोलमाफीसाठी आणि संरक्षण हक्क विधेयकासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करु. असा शब्द विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार सत्यजीत देशमुख यांनी दिला. वारणा महाविद्यालयाच्या पत्रकारिता महाविद्यालयातर्फे शनिवारी (ता. ११) जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दरेकर, श्री. देशमुख यांच्यासह आमदार प्रसाद लाड होते. वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजपचे युवानेते सम्राट महाडिक, सुखदेव पाटील, अशोक पाटील, जयदत्त पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष इलाई मुल्ला, खजिनदार बाबासाहेब पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. शिवाजी विद्यापीठ अधिसभेवर निवड झाल्याबद्दल डॉ. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. ‘‘सहकारात काम करीत असताना प्रतापराव विरोधी गटाचे होते, त्यांची सहकाराप्रती निष्ठा आणि त्यांच्या कामाने प्रभावित होऊन राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत त्यांना मदत केली. काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभे रहा, ही देवेंद्रजींची शिकवण आहे. त्यामुळे त्यांच्या टीममध्ये प्रतापराव तुमच्यासारखा माणूस हवा. देवेंद्रजींच्या टीममध्ये प्रतापराव मागे राहू शकत नाहीत. ऐतवडे, शिराळा, सांगली सोडून राज्यात शिक्षण आणि सहकारात काम करण्यासाठी देवेंद्रजींच्या टीममध्ये या.’’ अशी गळ श्री. दरेकर यांनी डॉ. पाटील यांना घातली. श्री. लाड म्हणाले, ‘‘देवेंद्रजींच्या ‘पी गँग’मध्ये म्हणजेच प्रवीण, प्रसाद, परिणय यांच्यासोबत यावे, प्रतापरावांना सामावून घेऊ, सहकार आणि शिक्षणाची जबाबदारी देऊ.’’
आमदार सत्यजित देशमुख म्हणाले, ‘‘इथल्या पत्रकारांनी ऊस आणि दुध दर आंदोलन उचलून धरले, म्हणूनच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकला.’’ अध्यक्षीय भाषणात खोत म्हणाले, ‘‘माझ्यासारख्या खेडेगावातील माणसाला श्री. दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण क्षेत्रात उभे केले.’’ प्रास्ताविकात डॉ. पाटील म्हणाले, ‘‘सहकार हाच आमचा पक्ष आहे. राज्य सहकारी संघाचे अध्यक्षपद मिळाले, त्यात आमदार दरेकर यांचे मोठे योगदान होते.’’ -
शेतकरी कर्जमाफी होणारच
‘‘अंथरूण बघून पाय पसरण्याऐवजी आम्ही अंथरूनच वाढवू. पण, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ.’’ तसेच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणे, ही चूक होती, त्यामुळेच स्वबळाचा नारा दिला जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. विधानसभा निवडणूकीत शिराळ्यातील जनतेला दिलेली आश्वासने पाळली जातील.’’ असे कार्यक्रमापुर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार दरेकर म्हणाले.
सकाळ’च्या शिवाजीराव चौगुले यांना पुरस्कार
वारणा महाविद्यालयातर्फे साहित्यप्राज्ञ स्व. बाजीराव बाळाजी पाटील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात येतो. ‘सकाळ’चे शिराळा तालुका प्रतिनिधी शिवाजीराव चौगुले आणि कोडोली येथील पत्रकार संजय भोसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २०० पत्रकारांचा तसेच सांगली जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
0 Comments