BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळ्यात चोरी Theft at Shirala



 शिराळा,ता.९ : शिराळा येथील कदम गल्ली मध्ये अज्ञात चोरटय़ांनी घराची कौले काढून ५ तोळे ४ ग्रॅम  सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत खाशाबा दादा पाटील (वय ७० )यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना १९डिसेंबर सकाळी ते २१ डिसेंबर सायंकाळी पाच दरम्यान घडली.या बाबत शिराळा पोलीसात अज्ञात विरोधात चोरीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत  शिराळा पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, खाशाबा पाटील यांच्या बंद घरावरील  अज्ञात चोरटय़ांनी  कौले काढून घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचे  लॉकर उचकटून साठ हजाराचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र ,चाळीस हजार रुपयाचा दीड तोळ्याचा नेकलेस, चाळीस हजाराची दीड तोळ्याची चैन ,दोन  हजार रुपये किमतीच्या दोन  ग्रॅमच्या दोन कानातील बाल्या ,एक हजार रुपये किमतीच्या दोन  ग्रॅमच्या  नाकातील दोन नथ ,असे   ५ तोळे ४ ग्रॅमचे दागिने लंपास केले आहेत.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे करत आहेत. 

Post a Comment

0 Comments