BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

उद्या बुधवार पासून शिराळ्याची विवेकानंद व्याख्यानमालाShirala's Vivekananda lecture series from tomorrow, Wednesday

  शिराळा,ता.१४: शिराळा येथील पूल गल्ली मध्ये  श्री दत्त मंदिर सभागृहात सांयकाळी ५.३० वाजता उद्या बुधवार पासून विवेकानंद व्याख्यानमाला सुरू होणार आहे.हे व्याख्यानमालेचे २८ वे वर्ष आहे. 

या व्याख्यानमालेत प्रथम पुष्प संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज प्रसिद्ध कीर्तनकार,समाजप्रबोधक  ह.भ.प. शिरीष महाराज मोरे  ( देहू )  हे गुंफणार आहेत. त्यांचा विषय शिवरायांचे हिंदुत्व असा आहे .गुरूवार दिनांक १६ जानेवारी रोजी द्वितीय पुप्ष  प्रसिद्ध विचारवंत व संपादक डॅा.उदय निरगुडकर ( मुंबई ) हे गुंफणार आहेत.त्यांचा विषय भारत @ ४७ ( स्वतंत्र भारताची १०० वर्ष )आहे . शुक्रवार दिनांक १७ रोजी  तृतीय पुप्ष सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र काटकर( पुणे )गुंफणार आहेत.त्यांचा विषय सर्वांसाठी विवेकानंद हा आहे.याच वेळी एच.पी.गॅस वितरक महाजन कन्सर्न्स,विवेकानंद मंडळ आणि टिडब्लुजे असोसिएट यांच्या वतीने घेतलेल्या विवेकानंद वृक्ष संगोपन स्पर्धाचे बक्षीस वितरण होणार आहे.याच वेळी स्व.पांडुरंग काळे व स्व.सौ.कल्पना पांडुरंग काळे यांचे स्मरणार्थ देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

     

Post a Comment

0 Comments