BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जनतेच्या लढ्यातूनच नवी जनहिताची धोरणे प्रत्यक्षात येऊ शकतातNew public interest policies can only be implemented through the people's struggle.



वारणावती :जनतेच्या लढ्यातूनच नवी जनहिताची धोरणे प्रत्यक्षात येऊ शकतात, हे श्रमिक मुक्ती दलाने आपल्या लढयातून दाखवून दिले असल्याचे  प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले.  मणदूर ता.शिराळा येथे सुरू असलेल्या संघटनेच्या वार्षिक अधिवेशनात बोलत होते. यावेळी पाटणकर  म्हणाले,  सत्ता ही निवडून दिलेले लोक राबवत नाहीत तर भांडवलदार राबवतात. त्यामुळं राज्य हे खऱ्या अर्थाने भांडवलदार आणि उच्च जातीयांचे आहे असे आपल्याला खेदाने म्हणावे लागते. एका बाजूला जातीच्या उतरंडीखाली आणि दुसऱ्या बाजूला भांडवलदारांच्या टाचेखाली आजही जनता आहे.अशा व्यवस्थेत आपण आजही राहतोय.आपल्याला नवा समृद्ध पर्यायी समाज आणायचा असेल तर जमीन, पाणी, उद्योग या क्षेत्रात पर्याय मांडून नव्या कृषी औद्योगिक पर्यायांची मांडणी करून चळवळ संघटित करावी लागणार आहे. ती करण्याची सुरवात आपण आजपासून करूया.. आमची संस्कृती ही न्यायाची, समतेची आहे ती आम्ही विसरणार नाही. ती अधिक जोमाने आपण पुढे घेऊन जाऊया .

कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई म्हणाले, महाराष्ट्र आज एका भयंकराच्या टोकावर उभा आहे, सत्तेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकांना खुलेआम कुचलले जात आहे. अशावेळी जाती धर्माची बंधने तोडून एकत्र येणे ही काळाची गरज आहे.परभणी,बीड मधली घटना कोणत्याही संवेदनशील माणसाला लाजेने मान खाली घालायला लावणारी आहे. 

   अॅड कृष्णा पाटील म्हणाले की श्रमिक मुक्ती दल ही नवे धोरण देणारी संघटना आहे. जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश याबाबतीत नवे धोरण सरकारला या चळवळीने घ्यायला लावले. 

यावेळी मोहन अनपट यांनी विठोबा रखुमाई मुक्ती आंदोलनासह इतर ठरावही मांडले. यावेळी सुधीर नलवडे, सुधीर काकडे यांनीही मनोगते व्यक्त केली. राज्य कार्यालय प्रमुख संतोष गोटल यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी निमंत्रक डी. के. बोडके, अंकुश शेटगे, शशिकांत सावंत, मारुती पाटील, आनंदा सपकाळ, सुरेश पाटील, पी .डी .लाड, सखाराम पाटील, शंकर पाटील, जगन्नाथ कुडतरकर, दाऊद पटेल, सरपंच शोभा माने यांच्यासह महराष्ट्रतील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments