BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

प्रतिटन ३ हजार २२५ प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा Deposited in farmers' accounts at Rs 3,225 per ton


शिराळा:चिखली (ता. शिराळा) : येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याने १५ डिसेंबर २०२४ अखेर गाळपासाठी आलेल्या उसाचा पहिला हप्ता प्रतिटन ३ हजार २२५ प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. ही माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक व उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिली. यावेळी सर्व संचालक व कार्यकारी संचालक अमोल पाटील उपस्थित होते. 

ते म्हणाले, सध्या २०२४-२५ गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. संचालक मंडळाने सांगली जिल्ह्यात सर्वाधिक ३ हजार २२५ प्रतिटन प्रमाणे पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस पुरवठा अत्यंत चांगल्या प्रकारे होत आहे. तोडणी व वाहतुकीची सर्व यंत्रणा सक्षम आहे. नोंदणीनुसार तोडणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘विश्वास समृद्ध शेतकरी’ हे ऊस विकासाचे अभिनव अभियान राबविण्यात येत आहे. या अभियान सहभागी शेतकऱ्यांनी कामी क्षेत्रात जास्तीचे उत्पादन घेऊन यश मिळविले आहे. सुरू गळीत हंगामात ७ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ठ ठेवले आहे.

श्री. नाईक व श्री. पाटील म्हणाले, प्रतिकूल परिस्थितून सहकारी साखर कारखानदारी जात असताना कारखान्याने सातत्याने सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. कामगारांचे हित जोपासले जात आहे. वर्षाच्या सुरवातीचा  मकर संक्रांत हा सण १४ जानेवारीस आहे. यानिमित्ताने १५ डिसेंबर अखेर कारखान्यास ऊस पुरवठादार सभासद शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार २२५ प्रमाणे पहिला हप्ता बँक खात्यावर जमा केला आहे. २०२४-२५ गळीत ४६ दिवसांच्या हंगामात २ लाख २६ हजार २६० मेट्रीक टनाचे गाळप झाले आहे. त्यातून २ लाख ६३ हजार ५३० क्विंटल साखर पोती उत्पादन झाले आहे. सुमारे ५ हजार ५०० मेट्रीक टन प्रतिदिनी गाळप होत आहे. तरी अजुनही ज्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ऊसाची नोंद केलेली नाही, त्यांनी जवळच्या गट कार्यालयाशी संपर्क करून नोंद करावी 

Post a Comment

0 Comments