वारणावती:चांदोली (ता.शिराळा) येथे धरणाच्या पायथ्याशी वारणा नदीत रविवारी (ता.१२) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मित्रांसह पोहण्यासाठी गेलेला अभिषेक समुवेल काळे रा .कोडोली (ता. पन्हाळा ) हा तरुण पाण्यात बुडाला.काल सायंकाळ पर्यंत शोध मोहीम सुरु होती.अंधार पडल्याने पुन्हा आज सकाळी खाजगी रेस्क्यू पथकाला बोलावून शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अभिषेक समुवेल काळे हा युवक आपल्या तोहित रफिक तांबोळी,अमोल दिलीप भोसले,प्रकाश शाहाजी चोपडे,इर्शाद जाकिर हुसने जमादार, अक्षय कृष्णात चरणकर, संदेश सुरेंद्र अवळे,दशरथ आशोक सुतार, सुजित संदेश चोपडे, सर्व रा. कोडोली या मित्रांसह चारचाकी वाहनातून चांदोली धरण येथे जेवण करण्यासाठी गेला होता. धरणाच्या पायथ्याशी उखळू (ता.शाहूवाडी) या बाजूस वारणानदी काठी सर्व मित्रांनी मिळून जेवण केले. जेवणापूर्वी अभिषेक हा आंघोळीसाठी पाण्याचा उतरला. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहत जाऊन पाण्यात बुडला. ही गोष्ट मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडा-ओरडा केल्यानंतर परिसरातील लोकांनी धाव घेतली. मित्रांसह त्याची शोधाशोध केली.परंतु तो आढळून आला नाही.याबाबत पोलिसांना साडेचारच्या सुमारास माहिती मिळाली. कोकरूड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयवंत जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. शोध मोहीम सुरु ठेवली परंतु अंधार पडल्याने मोहीम थांबवण्यात आली.
0 Comments