BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

 शिराळा :येथे  लकी मंगल कार्यालयात आयोजित अनुसूचित जाती जमाती मतदारांच्या स्नेह  मेळाव्यात  बोलताना उमेदवार आमदार मानसिंगराव नाईक सोबत शिवाजीराव नाईक, रणधीर नाईक, विराज नाईक, बी.के.नायकवडी, लालासाहेब तांबीट, संदीप तडाखे व इतर 

शिराळा,ता.१७:शिराळा येथे संविधान भवन होण्यासाठी व संविधान वाचावयाचे असेल तर या मतदारसंघातूनच नव्हे तर राज्यातून भाजपला हद्दपार केले पाहिजे असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार मानसिंगभाऊ नाईक यांनी केले. 

शिराळा येथे  लकी मंगल कार्यालयात आयोजित अनुसूचित जाती जमाती मतदारांच्या स्नेह  मेळाव्यात  बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष  रणधीर नाईक, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष  विराज नाईक,बी. के. नायकवडी, माजी पंचायत समिती सदस्य लालासाहेब तांबीट , विश्वासचे संचालक संदीप तडाखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  यावेळी आमदार मानसिंगराव  नाईक म्हणाले,आपण विकासाची भुमिका घेऊन निवडणुकीस सामोरे जात आहे. भाजप हा शाहू ,फुले ,आंबेडकर यांच्या विचारांचा पक्ष नसून त्यांची ध्येयधोरणे सामान्यांच्या पचणी पडणारी नाहीत. मागासवर्गीयांच्या वसतिगृहात बोगस विद्यार्थी दाखवून त्यांच्या नावावर पैसे खाणारी वृत्ती म्हणजे या समाजावर अन्याय आहे .त्यामुळे या वृत्तीला वेळीच ठेचली पाहिजे.. 

माजी राज्यमंत्री नाईक म्हणाले,  राज्याची अधोगती करणारे सरकार बदलायचं हे आता सर्वांनी ठरवलं आहे.१९९५ पासून मी व आमदार मानसिंगभाऊ  यांनी मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार मानसिंगराव नाईक यांचा विजय निश्चित असून शरदचंद्र पवार व जयंतराव पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी आपणं सर्वांनी डोळसपणे मतदान करावे.

संदीप तडाखे म्हणाले, या मतदारसंघात ५७ ते ५८ हजार आमचे मतदार आहेत. त्यामुळे मानसिंगभाऊ तुमच्या विजयात आमचा खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा असेल.आम्ही संविधानावर  घाला घालणाऱ्यास कधीही मतदान करणार नाही. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या नावावर पैसे खाणाऱ्यां सत्यजित देशमुख यांना मत मागण्याचा नैतिक अधिकारच  नाही.

यावेळी दत्ता तडाखे ,जयसिंगराव कांबळे,विशाल कांबळे,वैभव वाघमारे,विजय जाधव, महेश कांबळे,नंदकुमार नांगरे ,विकास चांदणे, शशिकांत वायदंडे, वंदना कांबळे,आनंदा कांबळे,अनिल शिंगारे,संपत कांबळे, तुषार कांबळे,बापूराव बडेकर, रणजीत कांबळे,बापूराव वायदंडे,प्रमोद कांबळे,वैभव वाघमारे  उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments