शिराळा,ता.१९ :शिराळा विधानसभा निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदार संघात असणाऱ्या ३३४ मतदान केंद्रावर ईव्हीएमसह लागणारे इतर मतदान साहित्य पोहच करण्यात आले आहे.या केंद्रावर होणाऱ्या मतदान प्रक्रिया साठी २००४ कर्मचारी नेमण्यात आले आहेत .
३३४ मतदान केंद्रावर देखरेख करण्यासाठी ३१ झोनल अधिकारी असून प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष तीन मतदान अधिकारी एक पोलीस व एक शिपाई ठेवण्यात आले आहेत.मतदान अधिकारी व कर्मचारी यांना ने-आण करण्यासाठी ५२ एसटी बस व ४९ जीप गाड्याची सोय केली आहे. प्रत्येक गाडीमध्ये जीपीएस सिस्टिम बसवण्यात आली आहे.२०० कर्मचारी राखीव ठेवण्यात आले असून झोनल अधिकारी ३१ आहेत. मतदारसंघात खुंदलापुर याठिकाणी नेट सुविधा नसल्यामुळे वेब सुविधा ठेवण्यात आली आहे. १६७ मतदान केंद्राचे नेट द्वारे कास्टिंग होणार आहे.विधानसभा मतदारसंघात ३११५ दिव्यांग मतदार असून त्यांना नेण्यासाठी व्हीलचेअर व वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदार संघात सर्वात जास्त मतदार येडेनिपाणी केंद्रावर १२६३ असून सवादकरवाडी मतदान केंद्रावर २१७ कमी मतदार आहेत .विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार १ लाख ५६ हजार १४० व स्त्री मतदार १ लाख ५० हजार ८६९ असे एकूण ३ लाख ७ हजार १२ मतदार आहेत व इतर ३ आहे.प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्यसुविधा पुरवण्यात येणार आहे. मेडिकल किट तसेच पाळणाघर व मदतनीस ठेवण्यात आले आहेत. रॅम व्यवस्था केली आहे. ईव्हीएम मशीन चारशे असून व्हीव्हीपॅट ४३४ सी यू मशीन ४०० आहेत सर्व मशीनची तपासणी करण्यात आली आहे. मतदार संघात कामेरी हे मतदान केंद्रे महिला अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मतदानाचे व वेळी अनुचित प्रकार होऊ नये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .त्यामध्ये एक पोलिस उपअधीक्षक दोन पोलीस निरीक्षक २० पोलीस उपनिरीक्षक ३०५ पोलीस १७४ होमगार्ड त्याचबरोबर कर्नाटक राज्यातील पाच पोलीस अधिकारी ९० पोलीस कर्मचारी आहेत. आरसीपी एक पथक आहे. मतदारसंघात ८ संवेदनशील गावे असून त्यामध्ये खुंदलापुर,शिराळा,मांगले,वाटेगाव,नेर्ले,पेठ,कामेरी,ऐतवडे खुर्द या गावांचा समावेश आहे.याठिकाणी रिझर्व फोर्स ठेवण्यात आला आहे.
शिराळा तालुक्यांतील ९५ गावातील
१५११६१ तर वाळवा तालुक्यातील ४८ गावांतील १५५८५१ असे एकूण ३ लाख ७ हजार १२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत
0 Comments