शिराळा:१० ऑक्टोबर२०२४ : तालुक्यात यावर्षी गत वर्षाच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने व अनेकवेळा परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने धरण,तलाव तुडुंब भरले आहेत.ऑक्टोबर महिन्यात पिकांना परतीचा पाऊस , विहिरी,ओढे यांचे पाणी उपलब्ध झाल्याने या वर्षी वारणा धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी गत वर्षाच्या तुलनेत सुमारे एक महिना उशिरा आलेली आहे.त्यामुळे ऑक्टोंबर महिन्यात वाचलेले पाणी पुढे आणखी एक महिना वापरता येणार आहे. गत वर्षी १७ ऑक्टोबर२०२३ रोजी धरणातून सिंचनासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले होते.
शिराळा तालुक्यात साधारण सप्टेंबर पासून पावसाचा जोर कमी येतो.त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत धरण,पाझर तलाव यांच्या पाणी पातळीत सुमारे २० टक्के पर्यंत घट येत असते. साधारण १५ ऑक्टोबर पासून वारणा धरणातून सिंचनासासाठी पाणी सोडण्याची लोकांची मागणी सुरु होते. या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली.त्यामुळे पिकांना पाणी मिळाल्याने या महिन्यात शेतकऱ्यांना कडून पाण्याची मागणी आली .त्यामुळे एक महिना धरणाचा पाणीसाठा वाढून राहिला. आता वारणा नदीला पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे वारणा धरणाची विद्युत निर्मिती सुरु करून १०२५ क्युसेकने विसर्ग नदीत सुरु आहे. आता कालव्यातून पाणी सोडण्याची लोकांची मागणी आहे. दोन दिवसात वारणा कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या व. लघु पाटबंधारे उपविभागा अंतर्गत शिराळा तालुक्यामध्ये एकूण ४९ पाझर तलाव ,११ सिमेंट नाला बंधारे, ५० वळण बंधारे पुर्ण क्षमतेने भरलेले असल्याने त्यांच्यातून होणाऱ्या पाण्याच्या पाझरा मुळे त्या परिसरात असणाऱ्या विहिरी,कुपनलिका,ओढे,नाले यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्या ठिकाणाहून शेतकऱ्यांना पाणी उपसा करणे सहज शक्य होत आहे. ज्या ठिकाणी विहिरी,विद्युत मोटारीच्या पाण्याची सोय नाही परंतु कालव्याचे पाणी पोहचू शकते अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी वारणा कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली आहे.त्यामुळे कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.
वारणा धरणाची आजची स्थिती.
धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टीएमसी.
पाणी पातळी ६२६.६० मिटर
पाणीसाठा ९६६.०८४ दलघमी
सध्याचा पाणीसाठा ३४.११टीएमसी म्हणजे ९९.१७ टक्के.
एकूण पाऊस ३९७९ मिलिमीटर
प्रत्येक वर्षी १५ ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी असते.यावर्षी गत वर्षाच्या तुलनेत झालेला दुपटीहून अधिक पाऊस आणि परतीचा पाऊस यामुळे सुमारे महिना लोकांची पाण्याची मागणी उशिरा आली आहे. त्याच्या मागणीनुसार वारणा नदीत पाणी सोडण्यात आले असून दोन दिवसात वारणा कालव्यातून पाणी सोडले जाईल.
मिलिंद कीटवाडकर (सहाय्यक अभियंता श्रेणी १ )
0 Comments