शिराळा,ता.१०:गड संवर्धन कार्यात युवकांनी सहभागी व्हावे असे प्रतिपादन ॲड. स्वप्नील पाटील यांनी केले.तडवळे (ता.शिराळा) येथे तालुकास्तरीय दुर्ग बांधणी स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी "आजचा युवक व शिवचरित्र" या विषयी आयोजित व्याख्यान प्रसंगी बोलत होते.यावेळी पाटील म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यात गड जिंकले मात्र त्या किल्ल्यांची सध्या दुरावस्था झालेली आहे.गड किल्ले हेच शिवाजी महाराजांची जिवंत स्मारके आहेत.त्यामुळे ही महाराजांची स्मारके किंवा गड किल्ले खऱ्या अर्थाने जिवंत ठेवायचे असेल तर त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.यात युवकांनी पुढाकार घ्यावा. या स्पर्धेत तडवळे व परिसरातील ५२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेचे ३ रे वर्ष आहे.
श्री गणेश मंडळ तडवळे कडून तालुका स्तरीय दुर्ग बांधणी स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेचे बक्षीस वितरण तडवळे येथे पार पडले.या स्पर्धेत प्रथम क्रमांक(एल.ई.डी. टीव्ही) संयुक्त छत्रपती शासन मंडळ (तडवळे ) यांनी पटकावला,द्वितीय क्रमांक (सायकल) शिवनेरी मंडळ(औंढी),तृतीय क्रमांक सार्वजनिक गणेश मंडळ (तडवळे )यांनी होमथिटर, तर चतुर्थ क्रमांक (पंखा)शुभम सुतार (अंत्री खुर्द )याने पटकावला.सर्व सहभागी स्पर्धकांना वह्या आणि पदक देण्यात आले.
स्वागत संतोष पाटील यांनी तर सूत्रसंचालन सिद्धांत पाटील यांनी केले.यावेळी महेश पाटील,सूरज पाटील,अशोक पाटील,विद्यार्थी,महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार मानसी पाटील यांनी मानले.
0 Comments