शिराळा,ता.५ :बोलण्यापेक्षा कामाला महत्त्व देवून मी आजवर वाटचाल केली आहे. त्यामुळे औद्योगिक, संस्थात्मक, विकासात्मक पातळीवर यश मिळाले आहे. यश मिळवण्यासाठी कधीही निष्ठा व प्रामाणिकपणा बाजूला ठेवला नाही. जे होणार आहे, त्याला हो, व जे होणार नाही त्याला नाही म्हणालो. विरोधकांप्रमाणे मी भावनांचा खेळ मांडत नाही. मला खात्री आहे, पाचवर्षापूर्वी दाखविलेला विश्वास याही निवडणुकीत कायम ठेवून मतदार माझ्यावर पुन्हा काम करण्याची जबाबदारी टाकतील असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार,आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखलवाडी, फकिरवाडी, लादेवाडी, देववाडी, मांगले (ता. शिराळा) येथे कार्यकर्त्यांशी संपर्क दौऱ्याच्या निमित्ताने बोलत होते. यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक, प्रचितीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, देवेंद्र नाईक, वारणा कारखान्याचे संचालक विजय पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी आमदार नाईक म्हणाले, मी वाड वडिलांची पुण्याई सांगत बसण्यापेक्षा नवनिर्मितीचा ध्यास घेऊन सतत जनसेवेत राहिलो. त्यामुळे लोकांचा विश्वास मिळला आहे. तालुक्याचा औद्योगिकरणाचा, विकासाचा चेहरा दिला आहे. पाच वर्षांच्या काळात शिराळा मतदार संघातील आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, दळणवळण सुविधा सक्षम केल्या आहेत.
रणधीर नाईक म्हणाले,मानसिंगराव नाईक यांनी अनेक संस्थांची मजबूत उभारणी करून शाश्वत व सर्वागिण आणि चौफेर विकास साधला आहे. त्यांच्या तुलनेत विरोधकांकडे काही नाही. मोकळ्या माळावर उभा राहूने ते मतदार संघातील जनतेला दिवास्वप्ने दाखवत आहेत. ही स्वप्ने कधीही सत्यात उतरणार नाहीत. जनतेने विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता विकासाचा चेहरा असणाऱ्या मानसिंगराव नाईक यांना विजयी करावे. त्यांचे निवडणूक चिन्ह तुतारी वाजवणार माणूस आहे.. त्यापुढील बटन दाबून त्यांच्या विजयात सहभागी व्हावे.चिखलवाडी, फकिरवाडी, लादेवाडी, देववाडी, मांगले या गावात सर्व नेते मंडळी, विविध संस्थांचे आजी, माजी पदाधिकारी, महाविकास आघाडीतील व मित्र पक्षांचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
0 Comments