BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अखेर महिलेचा खुनी जेरबंद झाला Woman's murderer jailed



कुरळप, ता. १४ नोव्हेंबर २०२४: कुरळप ता.वाळवा येथील इंदूबाई राजाराम पाटील या  वृद्धेवर अत्याचाराचा प्रयत्न करताना तिने प्रतिकार करताच तिचे हात व तोंड बांधून पोटावर विळ्याने वार करून खून केल्याप्रकरणी संशयित  म्हाकू  आनंदा दोडे (वय ४७) यास पोलिसांनी जेरबंद केले. खुनाच्या घटनेनंतर कसलेही पुरावे नसल्याने पोलिसांपुढे खुन्याला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांच्या समोर होते. अवघ्या  ५ दिवसांत पोलिसांनी मोठ्या शिताफीने खुनाचा उलगडा केला. गुरुवारी (ता. ८) खुनाची घटना घडली .याप्रकरणी सावत्र मुलगा मारुती राजाराम, पाटील (कुरळप) यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. इंदूबाई गुरुवारी सकाळी ११ वाजता शेळ्यांना चारा आणायला आणायला त्या कुरळपलगत असणाऱ्या ऐतवडे खुर्द येथील पवार मळ्यात नेहमीप्रमाणे गेल्या होत्या. सायंकाळपर्यंत त्या परत न आल्याने शेजाऱ्याने पवार वस्ती परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र त्या सापडल्यान नाहीत.शेताच्या बांधावर  गवत बांधण्यासाठी नेलेला त्यांच्या साडीचा धडपा सापडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याच ठिकाणी  इंदूबाईचा  शोध सुरू केला असता तिचा मृतदेह सापडला.. संशयित म्हाकू हा खुनशी वृत्तीचा होता. तो सतत रानामाळात भटकत असायचा, स्वतःची आई आणि पत्नी यांच्यावर देखील तो  अत्याचार करत होता. त्याच्या जवळ मोबाईल नव्हता, शिवाय त्याला कुणीच मित्र नसल्याने त्याला पकडण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. मात्र पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यामार्गदर्शनाखाली ठाणे प्रमुख विक्रम पाटील व त्यांची टीम घटनेनंतर दिवस- रात्र शोधमोहीम करत होती. अखेरीस ऐतवडे खुर्द येथील स्मशानभूमीजवळ म्हकु विळा घेऊन बसल्याची माहिती लागताच, गुरुवार (ता. १३) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, म्हाकू यास ताब्यात घेतले. इस्लामपूर न्यायालयाने ६ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी ठाणे प्रमुख पाटील यांच्यासह सहायक निरीक्षक राजेंद्र जाधव, चंद्रकांत कोळी, शरद जाधव, राहुल पाटील, कौस्तुभ पाटील, प्रशांत देसाई, प्रशांत चंद, सलमान मुलाणी आदी सहभागी होते.

Post a Comment

0 Comments