शिराळा,ता.१५: या शिराळा विधानसभा मतदार संघासाठी साखराळ्याचा नव्हे तर शिराळचा आमदार हवा आहे.त्यासाठी आम्ही मह्युतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या सोबत आहे.ज्यांच्या सोबत आम्ही असतो तोच आमदार असतो.त्यामुळे यावेळी सत्यजित देशमुख यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मच्छिंद्र सकटे यांनी केले.
शिराळा येथे भाजप कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी उमेदवार सत्यजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी म्हणाले, सकटे म्हणाले, ३३ वर्षे आम्ही सामाजिक चळवळीत काम करत आहे.सतत अन्याया विरुद्ध लढण्याचे काम केले. १९९९ पासून आम्ही शरद पावर यांच्या सोबत होतो.२०१९ ला आम्ही महायुती सोबत काम करण्यास सुरुवात केली. मोहळ व माळशिरस येथे अनुसूचित जातीचे नसणाऱ्यांना उमेदवारी देण्याचे शरद पवारांनी राजकारण केले.संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार त्यांनी हिसकावून घेतला. त्यामुळे आम्ही त्यांचाशी फारकत घेतली.
यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर अविश्रांत काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. महायुतीचे सरकार दलितांच्या बाजूचे आहे.हे सरकार संविधान व दलित विरोधी नाही.नरेंद्र मोदी यांनी २६ नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा करून दलितांचा सन्मान केला आहे. दलितांच्या अस्मितेचा सन्मान करणारे हे सरकार पुन्हा सत्तेत आले पाहिजे.वंचिताना काँग्रेस विरोध करत असेल तर त्यांना विरोध केलाच पाहिजे.
सत्यजित देशमुख म्हणाले,अनेकवेळा झालेल्या पराभवाची तमा न बाळगता पुन्हा जोमाने निवडणूकीस उभा राहिलो आहे. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यावर माझा विजय निश्चित आहे.जनतेने ही निवडणूक हाती घेतल्याने विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकली आहे.सर्व समाज्यातील लोकांना न्याय देण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले आहे.,आला विधिमंडळात संघी मिळाल्यावर वाटेगाव येथे आण्णाभाऊंचे नेत्रदीपक असे स्मारक उभारू.तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे..१९९९ सारखे तुम्हाला सोनेरी दिवस पुन्हा अनुया.
यावेळी दलित महासंघ चे सरचिटणीस उत्तम चांदणे, सांगली जिल्हा अध्यक्ष विकास बल्लाळ,रविंद्र बल्लाळ, बापूराव बसवंत, अनंत थोरात, तानाजी सकटे, अरुण सातपुते, अधिक देवकुळे, कृष्णा बाबर, राहूल बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments