BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

परतीच्या पावसाने आली जल समृद्धी Water prosperity came with the return of rain

 


शिराळा तालुक्यात यावर्षी  गत वर्षाच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. वारंवार परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले असले तरी धरण,पाझर तलाव,विहिरी,ओढे ,नाले  यांच्या पाणीसाठ्यात सुमारे दीड महिना  कायम वाढ टिकून राहिली आहे. त्यामुळे यावर्षी या तालुक्यात जल समृद्धी वाढली असल्याने याचा फायदा सध्या रब्बी पिका बरोबर जनावरांना पाणी पिण्यासाठी होणार आहे.  

शिराळा तालुक्यात साधारण सप्टेंबर पासून पावसाचा जोर कमी येतो.त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत धरण,पाझर तलाव यांच्या पाणी पातळीत सुमारे २० टक्के पर्यंत घट येत असते. साधारण १५ ऑक्टोबर पासून वारणा धरणातून सिंचनासासाठी पाणी सोडण्याची लोकांची मागणी सुरु होते.या वर्षी दीड महिना झाला अद्याप शेतकऱ्यांना कडून पाण्याची मागणी आलेली नाही.सध्या आज ६  नोव्हेंबरला वारणा धरणात ९९.७२ टक्के म्हणजे ३४.३० टीएमसी पाणीसाठा आहे. लघु पाटबंधारे उपविभागा अंतर्गत शिराळा तालुक्यामध्ये एकूण ४९ पाझर तलाव आहेत. त्यांची  पाणी साठवण क्षमता २३६.४१ दश लक्ष घन फूट असून सध्य स्थितीत ४७  पाझर तलाव पूर्ण क्षमतेने १०० टक्के  भरलेले असून २२५.९१ दश लक्ष घन फूट इतका पाणी साठा उपलब्ध झाला आहे. सर्व तलावाची सिंचन क्षेत्र क्षमता १९५९  हेक्टर आहे. तालुक्यामध्ये ११ सिमेंट नाला बंधारे पुर्ण  क्षमतेने भरलेले आहेत. त्यांची  पाणी साठवण क्षमता ४.५२  दश लक्ष घन फूट असून सध्यास्थितीत ४.५२ दश लक्ष घन फूट  पाणी साठा उपलब्ध आहे.सदर सर्व सिमेंट बंधारे यांची सिंचन क्षेत्र क्षमता ४८.९७ हेक्टर आहे. तालुक्यामध्ये ५०  वळण बंधारे असून त्यांची सिंचन क्षेत्र क्षमता १०८७  हेक्टर आहे. त्यामुळे या सर्व  पाटबंधारे प्रकल्पमधील पाणी साठ्याचा उपयोग शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी अप्रत्यक्ष सिंचनाद्वारे होणार आहे. कारण तलाव,वळण बंधारे,सिमेंट नाले पुर्ण क्षमतेने भरलेले असल्याने त्यांच्यातून होणाऱ्या पाण्याच्या पाझरा मुळे त्या परिसरात असणाऱ्या विहिरी,कुपनलिका,ओढे,नाले यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.त्या ठिकाणाहून शेतकऱ्यांना पाणी उपसा करणे सहज शक्य होत आहे. 

   करमाळे नंबर १  व पाचुंब्री येथील  पाझर तलावाचे साठवण तलावामध्ये रूपांतर करण्यासाठी  दुरुस्तीचे काम मृदं व जलसंधारण विभागामार्फत सुरु आहे. त्यामुळे सद्यस्थितीत  दोन्ही तलावामध्ये ४० ते ५० टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.

यावर्षी पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये नियमित मान्सून च्या कालावधी मध्ये अनेकदा अतिवृष्टी झाली. परतीचा पाऊस देखील मोठया प्रमाणात झाल्याने तालुक्यातील पूर्ण क्षमतेने भरलेल्या ४७  पाझर तलावातून सलग ३  वेळाअतिरिक्त सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे.त्यामुळे सदर पाणीसाठ्याचा तलावांच्या खालील बाजूस असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी, रब्बी हंगामा करिता अप्रत्यक्ष सिंचनासाठी फायदा होणार  आहे. 

  प्रविण तेली ( उपविभागीय जलसंधारण अधिकारी शिराळा)


Post a Comment

0 Comments