BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

उद्या गोरक्षनाथ प्रकटदिन

 


शिराळा,ता.१२ : शिराळा येथील गोरक्षनाथ  मंदिरात   गुरुवारी (ता.१४ ) रोजी गोरक्षनाथ प्रकट दिना निमित्ताने  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 शिराळा येथील गोरक्षनाथ ठिकाण हे प्रतीपंढरपूर म्हणून ओळखले जाते .या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, अशा विविध जिल्ह्यातून हजारो भक्तांची गर्दी कार्तिकी व आषाढी एकादशी आणि गोरक्षनाथांच्या यात्रेसाठी येत असतात. गोरक्षनाथ प्रकट दिनी निमित्ताने  दर्शनासाठी  भविकांची गर्दी होत असते. सकाळी  पहाटे ३ वाजता महाअभिषेक,सकाळी साडे सहा ते साडे आठ वाजता विशेष अभिषेक ,सकाळी ९ ते ११ दरम्यान विठ्ठलराव तात्या वास्कर यांचे कीर्तन होणार आहे.सकाळी ११ वाजता गोरखनाथ जन्मकाळ व फुले बरसा होणार आहे. ११ ते दुपारी ३ पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गोरक्षनाथ भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक व आयोजक , मठाधिपती पीर योगी श्री .पारसनाथजी महाराज,आनंदनाथजी महाराज  यांनी केले  आहे.  

Post a Comment

0 Comments