शिराळा,ता. २२ :शिराळा येथील एसटी बसस्थानक आवारा समोर शिराळा -इस्लामपूर या मुख्य रस्त्यावर असलेल्या .पादचारी मार्गावरील भुयारी मार्गाचा स्लॅब कोसळू लागला आहे. तर काही ठिकाणी या पादचारी मार्गाची दुरवस्था झाली आहे.त्यामुळे पादचारी मार्ग व भुयारी मार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशी,पालक व स्थानिक नागरिकांच्यातून होत आहे.
शिराळा हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे लोकांची शासकीय कामासाठी नेहमी वर्दळ असते.शिराळा बस स्थानका समोर शिराळा -इस्लामपूर या मुख्य रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. येथे गॅस एजन्सी,पतसंस्था,बँका, गॅरेज, दवाखाना, ट्रॅक्टर व मोटरसायकल शो रूम , अन्य गाळे धारक आहेत. या मार्गावरून शिराळा पोलीस ठाणे, तहसीदार कार्यालय,पंचायत समिती, न्यू इंग्लिश स्कूल असल्याने शालेय मुले व वयोवृद्ध यांच्यासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांनी सुरक्षिततेसाठी पादचारी मार्ग केला आहे. त्यामुळे लोकांची व मुलांची चांगली सोय झाली आहे.परंतु एसटी बसस्थानक समोर रिक्षा थांब्या शेजारी पादचारी मार्गाने जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे.त्या भुयारी मार्गाने जाण्यासाठी पायऱ्या चढून वरती जात असताना असणारा स्लॅब कोसळला आहे.त्याची दिवसेंदिवस पडझड होत आहे. पादचारी मार्गाची ही दुरावस्था होऊ लागली आहे. आणखी दुरावस्था होऊ नये म्हणून संबंधित विभागाने याची तत्काळ दाखल घेऊन दुरुस्ती करावी अशी मागणी पालक,विध्यार्थी व प्रवाशी वर्गातून होत आहे.
पादचारी मार्गामुळे वृद्ध प्रवाशी व विध्यार्थी यांची चांगली सोय झाली आहे.या मार्गाचा वापर सर्वात जास्त वृद्ध व विध्यार्थी करत आहेत. काही ठिकाणी संरक्षण ग्रीलची दुरवस्था झाली आहे. भुयारी मार्गावरील स्लॅब कोसळू लागला आहे.तो आणखी कोसळण्याची वाट न पाहता संबंधित विभागाने याची गांभीर्याने दाखल घेऊन दुरुस्ती करावी.
संजय हिरवडेकर (नागरिक )
0 Comments