शिराळा ,ता.११ : नोव्हेंबर २०२४ :पावसाला सुरू झाल्याने १७ जून ते १५ ऑक्टोंबर पर्यंत बंद असलेले चांदोली पर्यटन २६ ऑक्टोंबर पासून चार महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरु झाले आहे. त्यामुळे चांदोलीकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. १५ दिवसात ९३७ पर्यटकांनी चांदोलीला भेट दिली आहे.दिवाळी सुट्टी असल्याने कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे.गत वर्षीच्या पर्यटन हंगामा मध्ये साधारणपणे साडे सात हजाराहून अधिक पर्यटकांनी निसर्ग पर्यटनाचा आंनद घेतला आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना नुसार पावसाळ्याच्या कालवधी मध्ये व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील पर्यटन बंद असते. या वर्षाचा पर्यटन हंगाम १६ जून ऐवजी १७ जून रोजी समाप्त झाला होता. आहे. त्यामुळे नेहमी प्रमाणे पावसाळ्याच्या ४ महिने कालावधीसाठी चांदोली पर्यटन बंद होते. पावसाळ्यात मध्ये जंगालातील कच्चे रस्ते व नाले यामुळे वाहनांच्या येण्या जाण्यावर अडथळा निर्माण होतो.अशा वेळेस कच्चे रस्ते खराब होतात. त्यामुळे पावसाळ्यात राष्ट्रीय उद्याने बंद ठेवण्यात येते. महाराष्ट्रतील सहा व्याघ्र प्रकल्प पैकी एक असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा पश्चिम महाराष्ट्र मधील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मध्ये निर्सग पर्यटनासाठी ७ निसर्ग पर्यटन झोन असून दर वर्षी पर्यटन हंगामा मध्ये राज्यातील विविध ठिकाणावरून पर्यटक व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी येत असतात. पर्यटन हंगामा मध्ये व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात पर्यटकांच्यासाठी जंगल सफारी, ट्रेकिंग, पक्षी निरीक्षण, गडकिल्ले व परिसरातील निसर्ग सौंदर्य, वृक्ष संपदा आणि विविध वन्यप्राणी पाहण्याची संधी उपलब्ध असते. या गत वर्षीच्या पर्यटन हंगामा मध्ये साधारणपणे साडे सात हजाराहून अधिक पर्यटकांनी चांदोली येथे भेट देऊन निसर्ग पर्यटनाचा आंनद घेतला होता..
या सहलीसाठी ५० ते ७५ टक्के सूट
पर्यटनासाठी आलेल्या शिराळा तालुक्यातील शालेय सहलीसाठी ७५ तर सांगली जिल्ह्यातील शालेय सहलीला ५० टक्के सूट देण्यात आली आहे. जिल्ह्या बाहेरील सहलीसाठी सूट नाही.
१५ दिवसात पर्यटकांच्या भेटी
२६ ऑक्टोबर २०२४ ते ११ नोव्हेंबर २०२४
प्रौढ -८२१
लहान मुले -११६
शैक्षणिक सहली -२
एकूण -९३७
पर्यटन गुरुवारी बंद
प्रत्येक गुरुवारी पर्यटन बंद असते.त्यामुळे कोणाला ही आत सोडले जात नाही. पास सकाळी सहा ते दुपारी तीन पर्यत दिले जातात. सायंकाळी सहा नंतर पर्यटन बंद होते.
काशिलिंग बादरे वनपाल मणदूर
पर्यटन शुल्क
बारा वर्षा खालील मुले - प्रत्येकी ५० रुपये
प्रौढ व्यक्ती -१०० रुपये .
गाईड शुल्क -२५० रुपये
वाहन प्रवेश - लहान १००,बस १५०
छोटा कॅमेरा -५० ,मोठा १००
वन्यजीव विभागाचे वाहन असल्यास - प्रत्येक मुलांसाठी २०० रुपये (प्रवेश शुल्क ५० , बस शुल्क १०० ,गाईड ५० ).प्रौढ व्यक्ती २५० रुपये ( प्रवेश शुल्क १०० ,बस शुल्क १०० ,गाईड ५०).
0 Comments