खेड (ता.शिराळा) येथे विद्युत खांबावरून विद्युत मोटरसाठी नेलेल्या सर्व्हिस वायरचे शॉर्ट सर्किट होऊन ऊस जाळल्याने घटनास्थळी जावून पाहणी करताना विद्युत वितरणचे अधिकारी व कर्मचारी
शिराळा ,ता,१२ :खेड (ता.शिराळा) येथे विद्युत खांबावरून विद्युत मोटरसाठी नेलेल्या सर्व्हिस वायरचे शॉर्ट सर्किट होऊन यशवंत शामराव माळी, बाळाबाई सोनाप्पा माळी ,भीमराव शामराव माळी या तीन शेतकऱ्यांच्या सुमारे पंधरा गुंठ्यातील ऊस जळून नुकसान झाले आहे.ही घटना शनिवारी (ता.९) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.विद्युत वितरणचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, खेड येथील यशवंत शामराव माळी, बाळाबाई सोनाप्पा माळी ,भीमराव शामराव माळी यांची खेड येथील बेलदारवाडी रोडवर असलेल्या धनगरवस्ती जवळ शेती आहे. या शेतात विद्युत पंपासाठी गेलेल्या विद्युत वायरचे सुमारे शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाले.त्यावेळी शेता जवळ घर असलेल्या कृष्णात बाळू तांदळे यांनी उसाला आग लागल्याची माहिती प्रताप माळी यांना दिली. त्यावेळी प्रताप माळी यांनी भीमराव माळी ,प्रताप माळी,यशवंत माळी,आनंदा माळी,रघुनाथ माळी व इतरांच्या सह येवून झाडाच्या फांद्यानी आग विझवली.वायरमन अक्षय साठे यांना बोलावून विद्युत पुरवठा खंडित केला. यावेळी
विद्युत वितरणचे सहाय्यकअभियंता शिवाजी कदम, विद्युत निरीक्षक सागर शिर्के, वायरमन अक्षय साठे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.यावेळी शेतकरी भीमराव माळी ,प्रताप माळी, यशवंत माळी, आनंदा माळी, रघुनाथ माळी उपस्थित होते.
0 Comments