BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बीज प्रक्रिया करूनच रब्बीचा पेरा करा

 बीज प्रक्रिया करूनच रब्बीचा पेरा करा 

निलेश अडसुळे(मंडल कृषी अधिकारी): मर, मूळकूज रोगांचा प्रादुर्भाव टाळा.

शिराळा,ता.५:परतीच्या पावसाने थोडी उसंत घेतल्याने सर्वत्र भातपीक काढणीला सुरुवात झाली आहे. सोयाबीन, भुईमूग काढून बळीराजा रब्बी गहू, हरभरा, ज्वारी लागवडीचे नियोजन करत आहे. हरभरा पीक रोपावस्थेत असताना मर व मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीजप्रक्रिया करूनच हरभरा पिकांची पेरणी करा, असा सल्ला शिराळा मंडल कृषी अधिकारी निलेश अडसुळे यांनी दिला.

यावेळी अडसूळ म्हणाले, शिराळा कृषी मंडलांतर्गत येणाऱ्या  गावांतील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या लागवडीचे नियोजन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत होती. यंदा हरभरा लागवडीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. हरभरा पिकातील मर रोगामुळे झाडाची पाने पिवळी पडून कोमजतात. हिरव्या अवस्थेतील झाडाचे वाढते रोप उपटून पाहिले असता, मुळे सडलेली दिसतात व सहज उपटली जातात. हरभरा पीक रोपावस्थेत असतानाच मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उपाययोजना म्हणून हरभरा पेरणीच्या आधी परतीच्या पावसाने मुक्काम ठोकला होता. त्यामुळे खरीप हंगामातील काढणीला आलेल्या पिकांची नासाडी झाली. हे वातावरण रब्बी हंगामासाठी पिकांच्या लागवडीसाठी पोषक आहे. यामुळे रब्बी हंगामातील लागवड क्षेत्रात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

भात कापणी सुरू आहे.या क्षेत्रात हरभरा लागवडीचे नियोजन बळीराजा करत आहे. मात्र अधुन-मधून ढगाळ वातावरण असल्यामुळे मशागतीला विलंब होत आहे. बीज प्रक्रिया करूनच हरभरा पेरणी करावी . गव्हाच्या तुलनेत हरभरा पिकाला पाणी कमी लागत असल्याने या पिकाची निवड केली जाते.ट्रायकोडर्मा शेणखतातून शेतात फेकावे, बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

विशाल पाटील, कृषी सहायक शिराळा


Post a Comment

0 Comments