BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्या वक्तव्यावर सदाभाऊंची दिलगिरी



सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल जत येथे केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल आमदार सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली.ही गावगाड्यातील भाषा आहे. परंतु, काही लोकांनी अर्थाचा अनर्थ केला. ते म्हणाले, कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.त्या दुखावल्या  असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो..'कुणाच्या व्यंगावर बोलण्याचा हेतू नव्हता.  माझे वक्तव्य मागे घेतो. राजकीय आणि सामाजिक चेहऱ्यावरील हे भाष्य आहे. ' दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदाभाऊंना फोन करून नाराजी व्यक्त केली आहे. त्याबाबत श्री. खोत यांना विचारले असता, ते म्हणाले, 'अजितदादांचा फोन आला होता. ते म्हणाले, की अशी वक्तव्ये भावनेच्या भरातदेखील करू नका. साहेब आमच्यासाठी आदरणीय आणि ज्येष्ठ आहेत. एकमेकांच्या धोरणावर बोलूया.'

काय बोलले होते सदाभाऊ पहा 

 

Post a Comment

0 Comments