जाणून घ्या सांगली जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघाचे निवडणूक अपडेट
सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४ | |||
---|---|---|---|
सांगली | मिरज | तासगाव-कवठेमहांकाळ | खानापूर |
शिराळा | इस्लामपूर | जत | पलूस-कडेगाव |
शिराळा ;६ नोव्हेंबर २०२४ :शिराळा तालुक्यातील चिंचोली येथे शेडगेवाडी-कोकरूड या मुख्य रस्त्यानजिक असलेल्या घराचे मध्यरात्री कुलूप तोडून ४ लाख ६१ हजार रुपयांची चोरी झाली. ही घटना मंगळवार ५ रोजी मध्यरात्री १२.३० ते १.३० वाजन्याच्या सुमारास घडली.याबाबत बाजीराव आनंदा जाधव यांनी कोकरुड पोलिसात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात कोकरूड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत कोकरूड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बाजीराव जाधव यांचे कोकरूड-शेडगेवाडी रोड लगत घर आहे. जाधव आपल्या कुटुंबासोबत बाहेरगावी गेले होते.त्यामुळे घर बंद होते. चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत घराच्या समोरील दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील कपाटामध्ये असलेले ३ लाख ७० हजार किमतीचे सोन्याचे दागिने,३६ हजार रुपये किमतीची चांदीचे दागिने, व रोख रक्कम ५५००० हजार रुपये ,असा एकूण ४ लाख ६१ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला. जाधव कुटुंबीयांनी ऑनलाइन मागवले साहित्य देण्याकरिता गेलेला डिलिव्हरी बॉय यांच्या निदर्शनास ही घटना आली.त्याने घराशेजारील लोकांना याची माहिती दिली. त्यानंतर बाजीराव जाधव यांना शेजारील लोकांनी फोनवरून या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण ,पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, उपनिरीक्षक सुषमा मोहिते यांनी भेट देऊन दिली. डॉग पथकास देखील पाचारण करण्यात आले होते.मात्र कोणत्याही प्रकारचा सुगावा लागला नाही. अधिक तपास पोलीस उपनरीक्षक सुषमा जाधव करत आहेत.
0 Comments