BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नाईक साहेबांचा आदेश म्हणजे विषयचं खल्लास Naik Saheb's order is the subject matter



 कार्यकर्त्यांनो  सावध व्हा.विरोधकांच्या कडून आपल्यात फूट पाडली जात आहे.आपल्या संघटनेत सर्व सामान्य कार्यकर्ता आहे.कोणी ही मोठा नेता नाही.फक्त नाईक साहेब यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. त्यांचा हाच जिव्हाळा आपली ताकद आहे.

विरोधक म्हणत आहेत नाईक साहेब मैदानात नाहीत.आम्हाला मदत करा. आता स्वतःच्या स्वार्था साठी विरोधकांना  आमचा कार्यकर्ता दिसत आहे. त्यांना स्वतःच्या नावावर मत मिळत नसल्याने नाईक साहेबांच्या नावावर  जोगवा मागत आहेत. त्यांना नाईक साहेब यांच्या बद्दल  एवढा कळवला आहे तर त्यांनी २००९,२०१९ ला यातला एक टक्का कळवला का दाखवला नाही. त्यामुळे त्यांच्या  धूर्त चाली लक्षात घ्या.जे स्वार्थासाठी  गेले त्यांना त्यांचा लखलाभ असो ,पण लक्षात ठेवा .आपण मानसिंगराव नाईक यांच्या विजयासाठी आणि त्यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी जीवच रान करू. कारण नाईक साहेबांचा आदेश म्हणजे विषयचं  खल्लास? असे परखड मत कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्यात  व्यक्त करून यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक यांनी विरोधकांच्यावर टीकास्त्र सोडले. 


Post a Comment

0 Comments