मिरज: भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे (वय ५२, रा.रा,मिरज यांचा कुन्हाडीने सपासप वार करून निघृण खून करण्यात आला. जमीन विकसक म्हणून व्यवसाय करणारे खाडे काल सकाळी मिरज-पंढरपूर रस्त्यावर एका वादग्रस्त जमिनीत कुंपण घालण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला.या हत्येने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याप्रकरणी युवराज लक्ष्मण चंदनवाले (वय २३, रा. राममंदिर मागे, पंढरपूर रस्ता, मिरज) याला अटक केली आहे.याबाबत महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, खाडे यांनी पंढरपूर रस्त्यावरील पावणेचार एकर न्यायप्रविष्ट असणारी जमीन विकसनासाठी घेतली होती. या जमिनीच्या मालकी हक्कावरून खाडे आणि संशयित चंदनवाले यांच्यात दोन-तीन वर्षापासून वाद सुरू होता. काल शनिवारी सकाळी या जागेवर कुंपण मारण्यासाठी ते फिर्यादी आप्पा मारुतीराव ओतारी कामगारांसह संबंधित शेत जमिनीमध्ये गेले होते. यावेळी जमिनीचे कब्जेधारक आणि सुधाकर खाडे यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी चंदनवाले याने घटनास्थळी असलेल्या कुऱ्हाडीने हल्ला केला. हा वार खाडे यांच्या मानेवर वर्मी बसला. ते जागीच कोसळले. अन्य सहकाऱ्यांनी खाडे यांना खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी संशयितास तत्काळ अटक केली आहे.
0 Comments