कुरळप, ता. १५ नोव्हेंबर २०२४ : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील आदित्य शिवाजी गायकवाड (वय २२) या व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून खून केला.खुनानंतर संशयित वडील शिवाजी जयराम गायकवाड (४८) स्वतः कुरळप पोलिस ठाण्यात हजर झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आदित्य याला विविध व्यसने होती. त्या रागातून घरात सातत्याने वाद होत होते.वडील त्यास व्यसन बंद करण्याविषयी वारंवार सांगत होते. त्यातून त्यांच्यात भांडण होत होते. काल सकाळीही जोरदार भांडण झाले. त्यावेळी वडील शिवाजी यांनी घरात असणारे टिकाव त्याच्या डोक्यात घातले. ते इतक्या खोलवर गेले की, त्यात आदित्य जागीच ठार झाला.त्यानंतर वडिलांनी कुरळप पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. कुरळप ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील यांच्यासह पोलिस बापू कुंभार, राजेंद्र यादव, राहुल पाटील, कौतुभ पाटील तपास करत आहेत.
आठवड्यात तिसरी घटना
कुरळप पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका आठवड्यात तिसरा खून झाल्याने वाळवा तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी (ता. ८) कुरळप येथील इंदूमती पाटील या सत्तरवर्षीय वृद्धेचा हात-पाय, तोंड कपड्याने बांधून व विळ्याने वार करून खून करण्यात आला. मंगळवारी (ता.१२ )चिकुर्डे (ता. वाळवा) येथे विवाहिता कविता उत्तम बुरसे-पाटील (वय ४२) यांचा घरगुती वादातून पतीने डोक्यात दगड घालून खून केला.काळ शुक्रवार (ता.१५ ) आदित्य शिवाजी गायकवाड (वय २२) या व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून खून केला.
0 Comments