BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शेळ्यावर बिबट्यांचा हल्ला Leopard attack on goat

 


शिराळा,ता.९:पणुंब्रे तर्फ शिराळा (ता.शिराळा) येथील अशोक कृष्णा पाटील यांच्या बोकडावर तर शंकर गणपती यटम  यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. एका तासात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडल्याने व दोन वेगवेगळे बिबटे असल्याने  या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शिवरवाडी ,टाकवे, पणुंब्रे तर्फ शिराळा,बांबवडे या परिसरात बिबट्यांच्या मुक्त संचार वाढला आहे. हि घटना काल शुक्रवारी (ता.८) रोजी घडली .

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी,अशोक कृष्णा पाटील हे गावच्या उत्तरेस महादेवनगर जवळ असलेल्या मंगोबा मंदिराच्या बाजूला आपल्या शेळ्या घेवून चारावयास गेले होते.त्यावेळी ४ वाजण्याच्या सुमारास अशोक यांच्या डोळ्यासमोर  झुडपातून बिबट्याने येवून  बोकडावर झडप टाकून  त्यास ओढून घेवून निघाला असता अशोक पाटील यांच्यासह जनावरे घेवून आलेल्या जगन्नाथ पाटील,संतोष पाटील यांनी आरडाओरडा केला.त्यावेळी बिबट्याने बोकाडस तिथेच टाकून पळ काढला. त्यात बोकड जखमी झाला आहे.दरम्यान गावच्या दक्षिणेला बामनदरा येथे शंकर गणपती यटम यांच्या पत्नी सुजाता शंकर यटम ह्या त्यांच्या शेळ्या घेवून चारावयास गेल्या  होत्या.त्यावेळी ५ वाजण्याच्या सुमारास  त्यांच्या समोर गवत व झुडपा मधून आलेल्या बिबट्याने  शेळीवर झडप घातली.त्यावेळी घाबरलेल्या सुजाता यांनी आरडाओरडा केला असता परिसरात जनावरे घेवून आलेल्या सर्जेराव पाटील,अरुण सुर्यगंध हे त्यांच्या मदतीला धावून आले. सर्वांनी आरडाओरडा केला असता शेळीला तिथेच टाकून बिबट्या पळून गेला.याबाबत जगन्नाथ घागरे  यांनी वन विभागास माहिती दिली. घटनास्थळी वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे,वनरक्षक स्वाती कोकरे,वनमजूर दादासो शेटके,सुदाम जाधव,यांनी भेट देवून पंचनामा केला. जखमी शेळी व बोकडावर पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण शिसाळ यांनी उपचार केले.

 हल्ला केलेले दोन बिबटे 

बोकडावर हल्ला केलेला बिबट्या मोठ्या असून शेळीवर हल्ला केलेला छोटा आहे.चार दिवसापूर्वी शिवरवाडी व पणुंब्रे तर्फ शिराळा हाद्दीवर असलेल्या दगडू कांबळे यांच्या घराचे काम सूर आहे.त्या घरात बिबट्या आपल्या दोन बछड्या सह दगडू कांबळे यांच्या  मुलास दिसला होता.तीन दिवसा पूर्वी टाकवे व पणुंब्रे तर्फ शिराळा येथील हद्दीवर बिबट्या माझ्या गाडी समोर आला होता.  

जगन्नाथ घागरे ( नागरिक पणुंब्रे तर्फ शिराळा)

Post a Comment

0 Comments