पेठ:
महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर महाराष्ट्रात पूर्ण शेतकऱ्यांची कर्ज माफी करून सातबारा कोरा करण्याचा निर्णय घेतला आहे.पालकमंत्री,अर्थमंत्री आणि जलसंपद मंत्री असणाऱ्या जयंतराव पाटील यांनी या योजनेला फुटकी कावडी दिली नाही विकासाची गंगा अशीच सुरु ठेवण्यासाठी आपले महायुतीचे सरकार आले पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असणाऱ्या पाठीशी ठाम उभे रहा.असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पेठ (ता.वाळवा) येथे महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले,मी पावसात सभा घेत असल्याने तुमचा उमेदवार नक्कीच निवडणून येईल हे निश्चित आहे.आपल्याला सुसंकृत व जमिनीवर पाय असणारा नेता हवा. वाकुर्डे योजना युती शासनाने आणली. १९९९ ते २०२४ पर्यंत १५ वर्षे ही योजना कुलप बंद होती.त्यावेळी पालकमंत्री,अर्थमंत्री आणि जलसंपद मंत्री असणाऱ्या जयंतराव पाटील यांनी या योजनेला फुटकी कावडी दिली नाही.मी मुख्यमंत्री झाल्यावर १०० कोटी निधी दिला.महाराष्ट्रभर कालव्या ऐवज बंद नलीकेद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेतला. या योजनेला गती दिली. वाकुर्डेचे सर्वे टप्पे पूर्ण होत नाही तो पर्यंत निधी कमी पडून देणार नाही. ४५ हजार एकर जमीन ओलिताखाली आणणाऱ्या वारणा डावा कालव्यावरील ८० मीटर उंचीच्या २६ उपसा जलसिंचन योजना मार्गी लावतो. संभाजी महाराज स्मारकासाठी निधी देवू, आपल्या सर्व बसस्थानक,शिराळा औद्योगिक वसाहतीमध्ये व्यवसाय आणने,उपजिल्हा रुग्णालय सोयी सुविधा या मागण्या पूर्ण करू .हे सरकार सामान्य माणसांचे सरकार आहे. १५ वर्षे आपल्या शेतकऱ्यावर व उसाच्या कारखान्यावर इन्कमटॅक्सची तलवार लटकलेली होती. शरद पवार शेतकऱ्यावर इन्कमटॅक्स लावू नका म्हणून १५ वेळा दिल्लीला मनमोहनसिंग यांच्याकडे गेले पण हात हलवत परत आले.सुप्रिम कोर्टाने ही सांगितले होते इन्कमटॅक्स रद्द होत नसेल तर तो वसूल करा .आपले सरकारआल्यावर सहकार मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० हजार कोटीचा शेतकऱ्यांचा इन्कमटॅक्स रद्द केला. उसाला एफआरपी जास्त दिली म्हणून शेतकऱ्यावर इन्कमटॅक्स लावू नये हे सांगितले.त्यान जास्त पैसे देणे गुन्हा नाही हे आपल्या सरकारने सांगितले. कृषी पंप बिल माफ केले आहे. देशातील पहिल्या शेती वीज वितरण कंपनी अंर्तगत १४ हजार मेगावॉटचे सौर कृषी प्रकल्प सुरु केले. दन हजार मेगावॉट चे पूर्ण केले.१८ महिन्यात हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर ३६५ दिवस शेतकऱ्यांना दिवसा १२ तास आणि ज्यांना रात्री हवी असले त्यांना २४ तास मिळाले.उपसा सिंचन योजना सौर उर्जेवर चालवण्याची सुरुवात केली आहे.पहिली टेंभू ची योजना १५० मेगावॉट वर सुरु करतोय .टप्याटप्याने सर्व योजना सौर उर्जेवर आल्या तर बिना पैशाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचेल. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर महाराष्ट्रात पूर्ण शेतकऱ्यांची कर्ज माफी करून सातबारा कोरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असणारे आपले सरकार आहे.विविध योजनांच्या माध्यमातून प्रत्येक समाजातील घटकाचे कल्याण करण्याचे काम या सरकारने केले आहे.बांधकाम कामगारांना सर्व सुविधा दिल्या आहेत. या मतदारसंघात २५ हजार महिला लखपती दीदी झाल्या पाहिजेत.मुलींना मोफत शिक्षणाची सोय केली आहे. एसटी सलवत योजना सुरु केल्यामुळे तोट्यात आलेली एसटी फायद्यात आली आहे.लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा आम्ही सख्खे भाऊ आहोत पण मार्केटमध्ये सध्या सावत्र भाऊ फिरत आहेत. ते ही योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले होते. त्यामुळे सावध राहा. सम्राट महाडिक आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही.
खासदार धनंजय महाडिक ,आमदार सदाभाऊ खोत .राहुल महाडिक,सी,बी.पाटील ,निशिकांत पाटील,गौरव नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सत्यजित देशमुख म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपले सरकार स्थापन व्हायला हवे. सदाभाऊ खोत, महाडिक बंधू यांच्यासह सर्वच आपले शिलेदार जोमाने कामाला लागल्याने माझा विजय निश्चित आहे.त्यामुळे विरोधक सैरभैर झाले आहेत.सांगली बँक हा राजकीय अड्डा होऊ नये.कर्जासाठी लोकांचे पक्षांतर करून घेतले जात आहे.शिवाजीराव नाईक यांना ही कर्ज देवून फोडले आहे.साहेब लोकसभे प्रमाणे तुमच्या आदेशने या विधानसभेला यंत्रणा राबवली पाहिजे.
यावेळी सम्राट महाडिक म्हणाले, फडणीस साहेब तुम्ही या मतदार संघाची चिंता सोडा.तुम्ही मुख्यमंत्री व्हावे हीच जनतेची इच्छा आहे.वाकुर्डे योजना लवकर गतीमान झाली पाहिजे.चांदोली पर्यटनाला चालना द्यावी.गद्दारी आमच्या रक्तात नाही.जे बोललो तेच करून दाखवू .
यावेळी जगन्नाथ माळी,सागर खोत,प्रा.मच्छिंद्र सकटे, सुखदेव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी भगतसिंग नाईक, दि.बा.पाटील,रणजितसिंह नाईक ,पृथ्वीसिंग नाईक,सचिन जाधव,हणमंतराव पाटील,मोहन मदने , चंद्रकांत पाटील, जयराज पाटील,अशोकराव पाटील ,जयकर कदम,माजी नगरसेवक केदार नलवडे, रेणुकादेवी देशमुख,के.डी ,पाटील,डॉ ,प्रतापराव पाटील ,समित कदम उपस्थित होते.
0 Comments