BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

दुकानाला भीषण आग;३० लाखांहून अधिक साहित्यांचे नुकसान



मिरज :११ नोव्हेंबर  मिरजेतील वैरण बाजार येथील मुकेश भोजमलानी यांच्या धनलक्ष्मी किराणा स्टोअर या तीन मजली किराणा मालाच्या दुकानास सोमवारी (ता. ११) रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अंदाजे ३० लाखांहून अधिक साहित्यांचे नुकसान झाले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या बंबांनी दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले.

 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मिरजेतील वैरण बाजार येथील किराणा दुकानाला रात्री उशिरा आग लागली. दिवाळीमुळे खाद्यतेलांचे डबे आणि इतर ज्वलनशील पदार्थ सर्वाधिक असल्यामुळे आगीने क्षणार्धात तीन मजली इमारतीस व्यापून टाकले.महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत वीजपुरवठा खंडित केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

Post a Comment

0 Comments