BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विश्वासघाताने पाठीत खंजीर खुपसणाऱ्या दगाबाज प्रवृत्तीला चारीमुंड्या चित करा

 


शिराळा : विश्वासघाताने पाठीत खंजीर खुपसणाऱ्या दगाबाज प्रवृत्तीला चारीमुंड्या चित करण्याची संधी आली आहे. अफवांवर विश्वास न ठेवता महाविकास आघाडीचे उमेदवार मानसिंगभाऊंना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.

शिराळा येथे झालेल्या मतदार संघात येणाऱ्या वाळवा तालुक्यातील ४८  गावातील कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. उमेदवार आ. मानसिंगभाऊ नाईक, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक प्रमुख उपस्थित होते.

माजी राज्यमंत्री नाईक म्हणाले, माझा प्रत्येक कार्यकर्ता केलेल्या कट, कारस्थानांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. तो मानसिंगभाऊंच्या प्रचारात खांद्याला खांदा लावून आघाडीवर किंबहुना एक पाऊल पुढे असेल. विरोधक अफवा पसरवून आपल्यात दुही पाडण्याचे कट कारस्थान करताहेत, त्याला दाद देवू नका. शिवाजीराव नाईकांना समोरून आव्हान देणारा, लढणारा विरोधक नेहमी चालतो, पण जवळ बसून पाठीत खंजीर खुपसणारा दगाबाज चालत नाही. २००४  मतभेद झाले. पण १९९५  व ९९  च्या विजयात स्व. फत्तेसिंगअप्पा, मानसिंगभाऊ व त्यांच्या सहकाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता, हे विसरून चालणार नाही. त्याची परतफेड म्हणून जबाबदारीने आपणास मानसिंगभाऊंना विजयी करावेच लागेल. 

आमदार मानसिंगभाऊ म्हणाले, असाच स्नेहमेळावा १९९५ च्या निवडणुकीत नाईकसाहेबांना पाठिंबा देण्यासाठी स्व. लोकनेते फत्तेसिंगअप्पांनी चिखली येथे घेतला होत. एकदिलाने एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी साहेबांना विजयी केले. त्या विजयाची पुनरावृत्ती आपणास करायची आहे. विश्वासघातकी, कृर्तृत्वहीन मंडळीला कायमचे हद्दपार कराचे आहे. विकासात कसल्याही प्रकारचा वाटा नसणारे विकासावर गप्पा मारत आहे. शिराळा येथील सभेत भाजपचे विधानपरिषद गट नेते प्रवीण दरेकर म्हणाले, शिवाजीराव नाईक यांना आम्ही मदत करू. मग नाईकसाहेब यांचा उद्योग समूह अडचणीत होता. त्यावेळी त्यांनी मदत का केली झाले नाही ? अडचणीतील उद्योग समूह बाहेर काढण्यासाठी आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून कागद पत्रानुसार त्यांना कर्ज दिले आहे. विशेष बाब म्हणून कर्ज पुरवठा केला नाही.

यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक म्हणाले, कार्यकर्त्यांनो सावध व्हा. विरोधक आपल्यात फूट पाडत आहे. नाईकसाहेब यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता हाच जिव्हाळा, आपली ताकद आहे. विरोधक म्हणत आहेत नाईक साहेब मैदानात नाहीत. आम्हाला मदत करा. त्यांना स्वतःच्या नावावर मत मिळत नसल्याने नाईक साहेबांच्या नावावर मतांचा जोगवा मागत आहेत. साहेबांचा एवढा कळवळा २००९, २०१९ का नव्हता. त्यांच्या धूर्त चाली लक्षात घ्या. आपण आ. मानसिंगराव नाईक यांच्या विजयासाठी जीवच रान करू. आपणासाठी नाईकसाहेबांचा आदेश म्हणजे विषयच खल्लास, असे परखड मत व्यक्त करत विरोधक सत्यजित देशमुखांवर टीकास्त्र सोडले. 

ते म्हणाले, महाडीक यांचे आभार मानतो, ते शिराळ्यातील सभेत खरे बोलले. २०१९ ला आम्ही ठरवून नाईकसाहेबांचा कार्यक्रम केल्याची त्यांनी कबुली दिली आहे. २०१९  ला भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील हे अपक्ष लढणाऱ्यांशी चर्चा करत होते. त्या वेळच्या वाटघाटी ह्या अर्ज माघारी घेण्यासाठी नव्हत्या तर,  नाईकसाहेब यांना पाडण्यासाठी कट कारास्थान होते. ही भाजपला आमच्या बद्दल आत्मीयता होती. महाडीक म्हणतात आम्ही नाईकसाहेबांना मदत केली. मग आम्हीही मदतीची परतफेड व्याजासह केली. जिल्हा परिषद निवडणुकीत मदत करून केली. सम्राट महाडीक  यांना शिवाजीराव नाईक यांनी जि. प. चे दार दाखवले. त्यांच्या आईच्या विजयात ही सिंहाचा वाटा आहे. मात्र त्यांनी देखील २००९ ला आपलं पाय कापायचं प्रयत्न केले.यावेळी सतीश पाटील, वर्धमान बुद्रूक, नामदेव पाटील, अनिल जगताप, संदीप पाटील, अशोक जाधव, कृष्णा कारखाना संचालक दीपक पाटील, यशवंत ग्लुकोजचे संचालक विजय मुळीक, शहाजी पाटील, बाजार समिती संचालक सी. एच. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. अरविंद बुद्रूक, एम. के. जाधव, आश्विन पाटील, विजयराव नलवडे, विश्वास कदम, अशोक जाधव, प्रल्हाद पाटील, प्रकाश पाटील, विजय पाटील, उत्तम निकम, प्रताप जाधव, वसंतराव पाटील, विजय मुळीक, मदन पाटील, नथुराम लोहार, अशोकराव शिंदे, उत्तम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जयकर पाटील यांनी आभार मानले. बैठकीस वाळवा तालुक्याच्या ४८  गावातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments