BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

देवेंद्र पाटील यांचा निर्णय झाला Devendra Patil's decision was made

 


शिराळा,ता.१४:चहा प्यायच्या निमित्ताने आलेल्या भाजपच्या उमेदवाराने काढलेल्या फोटो सोशल मिडीयावर पसरवून पाठींबा दिल्याचा खोटा प्रचार करत आहेत.मी आ.मानसिंगभाऊंचा कार्यकर्ता असून विधानसभा निवडणुकीत त्यांचेच प्रामाणिकपणे काम करत आहे.मतदारांनी खोटा प्रचार करणाऱ्या भाजप उमेदवाराचा प्रचंड मतांनी पराभव करावा,असे आवाहन माजी सरपंच देवेंद्र पाटील केले. 

येथे महाविकास आघाडीचे उमेदवार मानसिंगभाऊ नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सरपंच श्री. पाटील यांच्या कार्यकर्त्यांची बैठकीत झाली,त्यावेळी ते बोलत होते.‘विश्वास’चे संचालक विजयराव नलवडे प्रमुख उपस्थितीत होते. 

माजी सरपंच पाटील म्हणाले,माझ्या घरी भाजपचे उमेदवार चहाला आले. उमेदवार आहेत म्हणून सत्कार केला पण आम्ही मानसिंगभाऊंचे कार्यकर्ते आहोत त्यांचे काम निष्ठेने करणार आहे, असे आम्ही स्पष्टपणे सांगितले.यावेळी फोटो सोशल मिडियावर पसरवून पाठींबा दिल्याचा खोटा बनाव निर्माण केला.या फसवेगिरीवर कोणीही विश्वास ठेवू नये,असा खुलासा माजी सरपंच देवेंद्र पाटील यांनी केला. 

ते म्हणाले, आजवर आ.नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल केली आहे.मला शिराळ्याचा सरपंच म्हणून व बंधू कीर्तिकुमार याला उपनगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली.नाईक यांनी कोट्यावधींचा निधी देत शिराळ्याचा सर्वांगिण विकास साधला आहे. मतदारांनी फसवणूक करणाऱ्या मंडळींच्या नादी लागू नये.मला आलेल्या अनुभवातून तुम्ही शिकावे.वेळीच सावध होऊन तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटण दाबून मानसिंगभाऊंना विजयी करावे.

उमेदवार आ.मानसिंगभाऊ म्हणाले,विरोधक भूलथापा मारण्यात पटाईत आहेत.हे महाभाग फसवणूक कशी करतात ते निनाईदेवी कारखान्याच्या सभासदांना विचारावे.शिवतीर्थ दूध संस्थाही बुडवली. स्व. शिवाजीराव देशमुख यांच्या नावाने असलेल्या मागासवर्गीय वसतिगृहातील बोगस लाभार्थी दाखवून यांनी तुमड्या भरल्या.हे विरोधकांनी केलेले कारनामे एका बाजूला आहेत. विकासकामांच्या जोरावर मी निवडणुकीत आहे.विश्वास कारखान्याच्या माध्यमातून दोन हजार सालापासून समाजकारणात सक्रिय राहून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले.औद्योगिक प्रकल्प उभारून यशस्वीपणे चालवले.सर्वसामान्य,शेती,शेतकरी, महिला व युवकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.लोकहिताची अनेक विकासकामे मार्गी लावली.तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटण दाबून विकास कायम ठेवण्यासाठी मला मतदान रुपी आर्शिवाद द्यावा. 

बैठकीस माजी सरपंच प्रमोद नाईक,नगरसेवक गौतम पोटे, माजी प.स.सदस्य लालासो तांबीट,उद्योजक घन:श्याम आवटे, रफिक अत्तार,वीरेंद्र पाटील,माजी बाजार समिती संचालक रमेश कांबळे,ॲड. सुधीर पाटील,डॉ.प्रदीप काकडे,संतोष लोहर, रवींद्र पाटील,अशोक शिंदे,राहूल पवार,अजिंक्य जाधव,दीपक पाटील,फारुख शेख,प्रवीण सवाईराम,सुदाम इंगवले,विठ्ठल कदम,सुभाष कदम,राज शिंदे,विजय सातपुते,युवराज कांबळे, सुरेश चिंचोलकर,दिनकर दिंडे उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments