शिराळा : जनतेला भूलथापा मारून फसविणाऱ्या भाजप पक्षाची व त्यांच्या शिराळा मतदार संघातील उमेदवाराची साथ सोडून मतदार संघाला विकासाचे वाटेवर घेऊन चालणाऱ्या मानसिंगभाऊंची साथ भक्कमपणे देणार आहे, असे प्रतिपादन अंत्री खुर्द (ता. शिराळा) येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रतापसिंग उर्फ सत्तूआण्णा चव्हाण यांनी केले.
चिखली (ता.शिराळा) येथे त्यांनी शिराळा मतदार संघातील अडीचशेवर कार्यकर्त्यांना घेऊन भाजपला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते मनोगत व्यक्त करताना बोलत होते. महाविकास आघाडीचे उमेदवार आ. मानसिंगराव नाईक यांच्यासह युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, तालुक्याचे उपसभापती सम्राटसिंग नाईक, विवेक नाईक प्रमुख उपस्थित होते. हा प्रवेश शिराळा मतदार संघात भाजपच्या उमेदवाराला जबरदस्त हादरा देणारा ठरणार आहे.
यावेळी चव्हाण बोलताना पुढे म्हणाले, आ. मानसिंगभाऊ यांनी शिराळा विधानसभा मतदार संघाच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. प्रत्येक गावात लाखो रुपयांची विकासकामे केली आहेत.विश्वास व विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून संस्थात्मक प्रगती साधली आहे.माजी राज्यमंत्री नाईकसाहेब यांच्या अनुभवी नेतृत्वाची त्यांना मार्गदर्शन आणि खंबीर साथ आहे. केलेली विकासकामे व साधलेला सर्वांगीण विकासाच्या जोरावर मानसिंगभाऊंचा पुन्हा विजय होऊन आमदार होतील निश्चित आहे. आम्ही सर्व मंडळींनी विकासाबरोबर राहण्याचा आम्ही निर्णय घेतला असून मानसिंगभाऊंना मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही कार्यकर्ते अहोरात्र कष्ट घेणार.
आ. मानसिंगराव नाईक म्हणाले, मी प्रदेशाध्यक्ष, आ. जयंतराव पाटील व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा लोकहित व विकासवादी दृष्टिकोनावर वाटचाल केली आहे. शिराळा मतदार संघातील जनतेने नेहमी माझ्या पाठीशी राहिली आहे. त्यांनी गेल्या निवडणुकीत दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत मी 2 हजार 275 कोटी रुपयांची निधी आणून जनहिताची कामे व सोई-सुविधा सक्षम केल्या आहेत. ही विकासाची मालिका पुढे सुरू ठेवण्यासाठी शिराळा-वाळव्यातील मतदार पुन्हा माझ्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करतील, याची खात्री आहे. यावेळी पदाधिकारी नरेंद्र करंजूसकर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी आ. मानसिंगभाऊ यांनी प्रवेश केलेले प्रतापसिंह चव्हाण, नरेंद्र करंजूसकर यांच्यासह सर्व प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा आ. मानसिंगभाऊ यांच्या हस्ते स्वागत करून सत्कार झाला. राष्ट्रवादीचे अंत्री खुर्दचे सरपंच दिलीप पाटील, माजी सरपंच दिनकर पाटील, जयसिंगराव चव्हाण, उपसरपंच राजेश चव्हाण, रोहित कदम, शिवाजी चव्हाण, वाय. बी. पाटील, संतोष जाधव, विशाल व अभिजित चौगुले, किरण घेवदे, ब्रह्मदेव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments