BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात फुलपाखरू सर्वेक्षणात १२२ फुलपाखरांच्या प्रजातीची नोंदButterfly survey in Sahyadri Tiger Reserve recorded 122 butterfly species




 जाणून घ्या सांगली जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघाचे  निवडणूक अपडेट 

 

सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४
सांगलीमिरजतासगाव-कवठेमहांकाळखानापूर
शिराळाइस्लामपूरजतपलूस-कडेगाव

  

शिराळा,ता.२५:सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मध्ये झालेल्या द्वितीय फुलपाखरू सर्वेक्षणामध्ये  १२२ फुलपाखरांच्या प्रजातीची नोंद करण्यात आली. यामध्ये अनेक महत्वपूर्ण व स्थानिक फुलपाखरांच्या नोंदी देखील करण्यात आल्या असल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र राखीव कराड च्या उप संचालक स्नेहलता पाटील यांनी दिली.

 यावेळी त्या म्हणाल्या,२० सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर २०२४ दरम्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मध्ये द्वितीय फुलपाखरू सर्वेक्षण करण्यात आले. सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या सह्याद्री वाईल्डलाईफ रिसर्च फॅसीलिटी (SWRF) च्या सिटीझन सायन्स उपक्रमाअंतर्गत राज्यभरातून एकूण ३८ फुलपाखरू प्रेमींनी या सर्वेक्षण मध्ये सहभाग घेतला होता. एकूण चार आठवड्यातील प्रत्येक शनिवार-रविवार व्याघ्र प्रकल्प मधील क्षेत्रीय कर्मचारी व सहभागी फुलपाखरू प्रेमी यांच्या माध्यमातून एकूण ७५ नियतक्षेत्रांमध्ये हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. सर्वेक्षण दरम्यान जंगल, गवताळ भाग, सडे व पाणथळ भाग अशा  सर्व अधिवासामध्ये सकाळी व सायंकाळी सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षण मध्ये एकूण १२२ फुलपाखरांच्या प्रजातीची नोंद करण्यात आली. यामध्ये अनेक महत्वपूर्ण व स्थानिक फुलपाखरांच्या नोंदी देखील करण्यात आल्या.यामध्ये महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मोरमोन,मलबार ट्री-निंम्फ,ब्लू-ओकलीफ,सदर्न ब्लू-बॉटल, क्रिमसन रोज तसेच नवाब, यामफ्लाय, कॉमन मॅप, कॉमन बँडेड पिकॉक अशा  अनेक सुंदर फुलपाखरांच्या नोंदी करण्यात आल्या. जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या एटलास-मॉथ पतंगाचीही नोंद या सर्वेक्षण मध्ये करण्यात आली. पावसाळ्यानंतर जंगलामध्ये फुलणारा रंगीत फुलोरा व परागीभवन करत पराग घेण्यासाठी फुलपाखरांची सुरु होणारी चढाओढ आणि याच दरम्यान विध्यार्थी व नागरिकांमध्ये फुलपाखरांबद्दल प्रेम व निसर्ग संवर्धनासाठी जागृती निर्माण करण्यासाठी देशभरात आयोजित केला जाणारा "बिग बटरफ्लाय मंथ" अंतर्गत हे फुलपाखरू सर्वेक्षण आयोजित करण्यात आले होते.पुढील काही महिन्यात पक्षी सर्वेक्षण आयोजित करण्यात आले  आहे. यामध्ये पक्षी प्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा हे आवाहन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

 मुक्त मराठी लघुचित्रपट  

-

व्रण मराठी  लघुचित्रपट 

 

टमरेल  मराठी लघु चित्रपट 

-

खराटा मराठी लघु चित्रपट 

 

                                       कहर मराठी लघुचित्रपट

 

Post a Comment

0 Comments