BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विहिरीत पडून महिलेचा मृत्यू. A woman died after falling into a well

 


शिराळा,ता.१९:वाकुर्डे खुर्द (ता.शिराळा) येथील विवाहिता सौ. स्वाती उदय वाकुर्डेकर (वय ४०) यांचा पाझर तलाव परिसरातील विहीरीतील पाण्यात पडून मृत्यू झाला.घटना आज शनिवारी (ता.१९) रोजी सकाळी साडे सात च्या दरम्यान घडली.याबाबत राजाराम कांबळे यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

   याबाबत शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की ,स्वाती वाकुर्डेकर या गेली बारा वर्षापासून मनोरूग्ण आहेत.त्यांना औषधउपचार सुरु होता.त्या वेडाच्या भरात पाझर तलाव परिसरातील विहीरीतील पाण्यात पडल्या. पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहेत.त्यांच्या पाठीमागे सासू,तीन मुली,पती असा परिवार आहे.पुढील तपास हवालदार सुभाष पाटील हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments