BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तलाठी ग्राम महसूल अधिकारी,अव्वल कारकुन सहायक महसूल अधिकारी,तर कोतवाल झाले महसूल सेवक Talathi Village Revenue Officer, Top Clerk Assistant Revenue Officer, Kotwals became Revenue Sevak.


 शिराळा,ता.१८:विविध संघटनांनी केलेल्या मागणी नुसार आता तलाठ्यांना ग्राम महसूल अधिकारी,अव्वल कारकुनांना सहायक महसूल अधिकारी,तर कोतवालांना  महसूल सेवक  असा पदाच्या नावास शासनाने मान्यता दिली आहे.त्यामुळे  तलाठी, कोतवाल, अव्वल कारकून हि नावे इतिहास जमा झाली आहेत.

महसूल विभाग हा शासनाचा कणा असून जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त स्तरावर कामकाज करण्यात येते. अव्वल कारकून या संवर्गास महसूल विभागामार्फत, मदत व पुनर्वसन विभागामार्फत, पाणी, पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत, गृह विभागामार्फत, सामाजिक न्याय विभागामार्फत राज्य पुरस्कृत योजना , केंद्र पुरस्कृत योजना, सामान्य प्रशासन विभागामार्फत, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत, रोजगार हमी योजना विभागामार्फत, राजशिष्टाचार विभागामार्फत विविध केंद्रीय व राज्य स्तरीय स्पर्धा परीक्षा ,नगर विकास विभागामार्फत, भारत / राज्य निवडणूक आयोगामार्फत, कार्यकारी दंडाधिकारी म्हणून तसेच इतर विविध विभागामार्फत नेमून दिलेली कामे व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकारी यांना कराव्या लागणाऱ्या सर्व कामांमध्ये मूलभूत माहितीचे संकलन करून त्यावर टिप्पणी सादर करणे, विविध मसुदे तयार करणे, महसूल विभागातील जमीन महसूलाचे दस्तऐवज / लेखे यांच्या नोंदी, एकत्रिकरण, अद्यावतीकरण करणे, शासनातर्फे नागरीकांना देण्यात येणारे विविध प्रमाणपत्रांची तपासणी करणे, नैसर्गिक आपत्ती काळात आपात्कालीन परिस्थितीच्या वेळी मदत व पुनर्वसनाचे कामे करणे, शेतकरी कर्जमाफी योजनेच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे इत्यादी स्वरूपांची काम अव्वल कारकून या संवर्गास पार पाडावी लागतात. या सर्व कामकाजांचे नियंत्रण करताना संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधताना महसूल विभागातील अव्वल कारकून संवर्गास एक विशिष्ट पदनाम असणे आवश्यक आहे. याकरिता महसूल विभागातील अव्वल कारकून यांचे पदनाम बदलून त्याला "सहाय्यक महसुल अधिकारी" असे पदनाम करण्याबाबतची मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेद्वारे करण्यात आली होती. त्या नुसार अव्वल कारकून ऐवजी सहायक महसूल अधिकारी म्हणून पदनाम देण्याचा शासन निर्णय झाला आहे.

 जिल्हाधिकारी यांनी  नमूद केलेली नोंदणीपत्रके,रजिस्टरे व जमाखर्च लिहिण्याचे काम तलाठ्याकडे असते. जमीन महसूल व जमीन महसूल थकबाकी म्हणून सर्व रकमा त्यांना  गोळा कराव्या लागतात. कोणत्याही वरिष्ठ महसूल अधिकारी किंवा पोलीस सांगतील ते  गावासंबंधी लिहिण्याचे काम तलाठयास करावे लागते. त्यामुळे महसूल विभागातील तलाठी  पदनामात बदल करून "ग्राम महसूल अधिकारी" असे  महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने मागणी केली होती.त्यानुसार महसूल विभागातील तलाठी  संवर्गाच्या पदनामात बदल करून "ग्राम महसूल अधिकारी" असे करण्यात आले आहे.कोतवाल संघटनेच्यावतीने ब्रिटीश काळापासून असणारे कोतवाल ऐवजी महसूल सेवक असे नाव करण्याची मागणी शासनाकडे केली होती.त्यानुसार आता कोतवाल यांना महसूल सेवक असे ओळखले जाणार आहे.

 या  पदनाम बदलामुळे भविष्यात वेतनश्रेणी वाढी संदर्भात प्राप्त होणारी कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही. तसेच, पदनाम बदलानंतर वेतनश्रेणी / वेतनस्तर देण्याच्या अनुषंगाने भविष्यात वेतनत्रुटी समितीपुढे मागणी करता येणार नाही व अशी मागणी विचारात घेतली जाणार नाही. सातव्या वेतन आयोगानुसार  वेतनस्तरामध्ये अथवा वेतनश्रेणीमध्ये बदल करण्याची वा वेगळयाने वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी विचारात घेतली जाणार नाही अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

 आम्ही ब्रिटिश काळा पासून कोतवाल म्हणून काम करत आहे.सर्व महसूल विभागाशी निगडित असणारी कामे आहे.त्यामुळे आमचे  कोतवाल ऐवजी महसूल सेवक असे पदनाम व्हावे अशी मागणी होती.ती पूर्ण झाल्याने आम्ही समाधानी आहे.

नंदू दाभाडे (संघटना तालुका अध्यक्ष )


Post a Comment

0 Comments