BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तीन मुलांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र कबड्डी संघात निवड Three boys selected for Maharashtra Kabaddi team for national tournament

 


शिराळा :येथील नॅशनल सायन्स गुरुकुल शिराळाच्या यश आडके, हर्षद माने, सतीश वळकुंजे या तीन मुलांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झाली.राष्ट्रीय स्पर्धा मध्य प्रदेश येथील नरसिंगपूर येथे होणार आहेत.

  कुंडल येथे शासकीय १७  वर्षीय शालेय राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या. क्रीडाधिकारी प्रशांत पवार यांचे मार्गदर्शना खाली राज्यात प्रथमच मॅटवर साखळीपद्धतीने स्पर्धा घेण्यात आल्या. नागपूर विभागाने छत्रपती संभाजी नगर संघावर सहज मात करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.त्यांनी स्पर्धेत मुंबई,पुणे, कोल्हापूर, छत्रपतीं संभाजीनगर अशा बलाढ्य संघावर मात करत राज्याचे विजेतेपद मिळवले. विजयी संघातील तीन खेळाडू महाराष्ट्र प्रतिनिधिक संघात घेतले आहेत.  त्यांचे पालघर येथे सराव शिबीर होणार आहे. त्यांना अकॅडमीच्या प्रशासक स्वाती बांदल,राहुल यादव,नामदेव गावडे, अजित शेळके,भीमराव बांदल,क्रीडा शिक्षिका तेजस्विता नॉर्वेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments