शिराळा,ता. ३१ :शिराळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शिराळा इस्लामपूर या रस्त्यावर पडलेले मोठ मोठे खड्डे आज बाजार समितीने बुजवल्याने गाळेधारक व प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. या बाबत सकाळने वारंवार पाठपुरावा केला होता.त्याची दखल घेऊन हे खड्डे बुजवण्यात आले आहेत.
बाजार समिती आवारात असणाऱ्या शिराळा -इस्लामपूर या रस्त्यावरगटारी नसल्याचे पावसाळ्यात रस्त्या कडेला खड्डे पडून पाणी साचून राहत होते.त्यामुळे येथे नेहमीच दलदल होत होती.त्यामुळे ग्राहकांना व गाळे धारकांना या दलदलीतून मार्ग काढत जावे लागत होते.शिराळा हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे लोकांची शासकीय कामासाठी नेहमी वर्दळ असते.शिराळा बस स्थानका समोर शिराळा -इस्लामपूर या मुख्य रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. येथे गॅस एजन्सी,पतसंस्था,बँका, गॅरेज, दवाखाना, ट्रॅक्टर व मोटरसायकल शो रूम , अन्य गाळे धारक आहेत. या मार्गावरून शिराळा पोलीस ठाणे, तहसीदार कार्यालय,पंचायत समिती, न्यू इंग्लिश स्कूल असल्याने शालेय मुले व वयोवृद्ध यांच्यासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांनी सुरक्षिततेसाठी पादचारी मार्ग केला आहे. त्यामुळे लोकांची व मुलांची चांगली सोय झाली आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस गटारी नसल्याने पावसाचे पाणी बाजार समिती आवारातील गाळा धारकांच्या अंगणात साचून मोठ मोठी डबकी तयार झाली होती. पाण्याचे डबके साचत असल्याने मोठ्या प्रमाणात डासांचा त्रास होत होता. त्यामुळे नगरपंचायतने साठेलेली डबकी मुजावावीत अशी मागणी गाळे धारकांच्या कडून होत होती.
रस्त्याच्या कडेला गटारी नसल्याने पावसाळ्यात अंगणात पाणी साचून त्याचा त्रास गाळे धारकांना होत होता. त्यामुळे येथील खड्डे बुजवावेत अशी मागणी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपंचायतकडे वारंवार केली होती. नागपंचमीला खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले होते.परंतु अद्याप कोणी ही दखल घेतली नाही. त्यामुळे निधीची कमतरत असताना गाळेधारक व प्रवाश्यांच्या सोयीसाठी आम्ही बाजार समितीच्यावतीने खड्डे बुजवले आहेत.
विजय महाडिक उपसभापती बाजार समिती
बाजार समितीच्या आवारात खड्डे पडून पाणी साचून राहिल्याने ग्राहक व गाळे धारकांना या दलदलीतून मार्ग काढत जावे लागत होते. या बाबत दै.सकाळने वारंवार वस्तुनिष्ठ बातमी देऊन पाठपुरावा केला होता.त्याची दाखल घेवून खड्डे बुजवले असल्या बद्दल सकाळचे अभिनंदन आणि बाजार समितीचे आभार
वसंत कांबळे जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी
0 Comments