BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला The number of stray dogs increased



 शिराळा,ता.१८ :शिराळा शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असल्याने लहान मुलांच्यासह शालेय मुली व महिलांना रस्त्यावर फिरणे मुश्कील झाले आहे.  त्यामुळे  नगरपंचायतने या मोकाट कुत्र्यांचा  बंदोबस्त करावा अशी मागणी रहिवाशी व प्रवाशी  यांच्याकडून होत आहे.

शिराळा येथे प्रत्येक चौकात व गल्ली बोळात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शिराळा बस स्थानक परिसर,नगरपंचाय , मटण  मार्केट ,इस्लामपूर-कोकरूड या मुख्यरस्त्यावर व प्रत्येक चौकात २०  ते ३०  कुत्र्यांचा कळप सतत फिरत आहे. अनेकवेळा मोटरसायकलच्या आडवे येत असल्याने अपघात झाले आहेत. काहींच्या अंगावर जाण्याचे प्रकार घडले आहेत. मटन मार्केट परिसरातून  महाविद्यालयाकडे मुलींना सकाळी जावे लागते. सकाळी बहुतांशी दुकाने बंद असतात.त्यामुळे इतर लोकांची वर्दळ कमी असते. असल्याने या मार्गावरून  जाणाऱ्या  महिला व लहान मुले,शालेय मुली यांच्या मनात कुत्र्यांचे कळप पाहून भीती निर्माण होत आहे. काहीवेळा कुत्रे अंगावर जाण्याच्या घटना घडत आहेत. शिराळा शहरात बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याला कुत्रे हे खाद्य सहज उपलब्ध होत असल्याने त्याने नागरी वस्तीत शिरकाव केला आहे. त्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. इस्लामपूर-कोकरूड या मुख्यरस्त्यावर कुत्र्यांचे कळप फिरू लागले असल्याने चार चाकी वाहनधारक हि त्रस्त झाले आहे.त्यामुळे नगरपंचायतने ह्या भटक्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. 

सकाळी बहुतांशी दुकाने बंद असतात.त्यामुळे मटन  मार्केट परिसारत इतर लोकांची वर्दळ कमी असते. या मार्गावरून  जाणाऱ्या  महिला, लहान मुले,शालेय मुली यांच्या मनात कुत्र्यांचे कळप पाहून भीती निर्माण होत आहे. काहीवेळा कुत्रे अंगावर जाण्याच्या घटना घडत आहेत..त्यामुळे नगरपंचायतने सावधानता म्हणून  या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. 

संतोष इंगवले (व्यापारी  ) 

Post a Comment

0 Comments