जाणून घ्या सांगली जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघाचे निवडणूक अपडेट
सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४ | |||
---|---|---|---|
सांगली | मिरज | तासगाव-कवठेमहांकाळ | खानापूर |
शिराळा | इस्लामपूर | जत | पलूस-कडेगाव |
शिराळा,ता.२४:शिरशी ( ता.शिराळा) येथील सहा वर्षांपूर्वी पडलेल्या दरोड्यातील फरारी संशयित आरोपी झाजम्या करतान्या पवार( वय ६२ वर्षे, रा. जुनेखेड, ता. वाळवा) यास शिराळा पोलिसांनी इस्लामपुर येथे साफळा रचून अटक केली.झाजम्या पवार यास न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की ,दि.२६ सप्टेंबर २०१८ मध्ये रात्री अशोक नामदेव शिरसट, मालन आनंदा महिंद तसेच हरीबा आनंदा महिंद यांच्या घरात त्याचे पत्नीस व बहीणीस कोयत्याने मारण्याचा धाक दाखवून आईस हाताने मारहाण करून करून ९९ हजार ३०० रुपयाचा ऐवज चोरला होता. त्यापैकी ७९हजार५५४ रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला होता. याप्रकरणी धरम उर्फ तडीतापड्या पितांबर शिंदे उर्फ काळे (वय ३० वर्षे, रा. हुबालवाडी, ता. वाळवा, सध्या पुनवत) ता. शिराळा ,झाजम्या करतान्या पवार(वय ६२ वर्षे, रा. जुनेखेड, ता. वाळवा), चिऊ काळे, मुक्या पवार, राकेश पवार ,जीन उर्फ आंधळया पक्ष्या काळे(वय २५ वर्षे, रा. भवानीनगर, ता.वाळवा)या सहा जाणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी पितांबर शिंदे व जीन काळे यांना अटक करण्यात आली होती. इतर सर्व फरारी होते.बुधवारी झाजम्या पवार हा इस्लामपुर मध्ये आल्याचे समजल्यावर पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम , सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे ,नितीन यादव , सुनील पेटकर, स्वप्नील दमामे, संदीप पाटील यांनी सापळा रचून त्यास अटक केली.
0 Comments