BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यातून गेल्याचे दुःख -गौरव नायकवडी Sadness of losing constituency to Shiv Sena - Gaurav Nayakwadi


 प्रत्येक मतदार संघावर क्लिक करा आणि जाणून घ्या सांगली जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघाचे  निवडणूक अपडेट 

 

सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४
सांगलीमिरजतासगाव-कवठेमहांकाळखानापूर
शिराळाइस्लामपूरजतपलूस-कडेगाव

 

आष्टा: २५ ऑक्टोबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून व मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन चार दिवसात इस्लामपूर मतदारसंघा बाबत  राजकीय निर्णय घेणार घेतला  जाईल .मी कधीही निवडणूक साठी गुडघ्याला बाशिंग बांधले नाही. पदासाठी लाचार झालो नाही. मला उमेदवारी मिळाली नाही याच्यापेक्षा हा मतदारसंघ शिवसेनेचा ताब्यातून गेला. याचे मोठे दुःख असल्याचे   प्रतिपादन हुतात्मा संकुलाचे युवा नेते गौरव नायकवडी यांनी केले.  वाळवा येथे कार्यकर्ता संवाद मिळाव्यात बोलत होते.

यावेळी गौरव नायकवडी म्हणाले,इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेचा होता. मागील वेळी मी लढलो होतो. यावेळीही मला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला मुंबईत बोलावून घेतले होते. पण वरिष्ठ पातळीवरील वाटाघाटीत हा मतदारसंघ अजित पवार राष्ट्रवादीकडे गेला आहे. मला अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर होती. पण ती मी नाकारली. पद, खुर्चीसाठी वैचारिक तडजोड करणे आमच्या रक्तात नाही. आम्ही क्रांतिवीरांचा वारसा जोपासतो. आम्ही कुणाला घाबरत नाही. सकाळी एका बरोबर आणि संध्याकाळी दुसऱ्या बरोबर ही आमची पद्धत नाही. आमदार जयंत पाटील यांना आजपर्यंत अनेक जणांनी विरोध केला आणि काही कालावधीनंतर त्या लोकांनी जयंत पाटील यांच्याशी सलगी केली. पण आम्ही त्यांचे एकमेव परंपरागत विरोधक आहोत. आम्ही कसलीही तडजोड केली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न मागता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पद दिले, कारखान्याला मदत केली. अशक्य वाटणारे क्रांतिवीर नागनाथ अण्णांच्या नावाचे महामंडळ स्थापन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा समूहाला बळ दिले आहे. त्यामुळे भविष्यकाळात त्यांच्या पाठीमागे हुतात्मा संकुल उभे राहील. मागील निवडणुकीत मला पक्षाकडून तिकीट मिळाले असताना निशिकांत पाटील यांनी बंडखोरी करण्याची  गरज नव्हती.कार्यकर्त्यांनी लढाईची तयारी दर्शवली आहे. चार दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. " 

यावेळी सरपंच संदेश कांबळे, व्ही. डी. वाजे, उमेश घोरपडे, उमेश कानडे, राजू मुळीक, रामचंद्र भाडळकर, भगवान पाटील, नंदकिशोर आटूगडे, अमोल पडळकर, राजकुमार सावळवडे, नंदू पाटील, गणेश शेवाळे, चंद्रशेखर तांदळे हुतात्मा उद्योग समूह व इस्लामपूर मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 मुक्त मराठी लघुचित्रपट  

-

व्रण मराठी  लघुचित्रपट 

 

टमरेल  मराठी लघु चित्रपट 

-

खराटा मराठी लघु चित्रपट 

 

                                       कहर मराठी लघुचित्रपट

 

Post a Comment

0 Comments