प्रत्येक मतदार संघावर क्लिक करा आणि जाणून घ्या सांगली जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघाचे निवडणूक अपडेट
सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४ | |||
---|---|---|---|
सांगली | मिरज | तासगाव-कवठेमहांकाळ | खानापूर |
शिराळा | इस्लामपूर | जत | पलूस-कडेगाव |
शिराळा २५ ऑक्टोबर : मणदूर (ता. शिराळा) येथे हुतात्मा स्मारकाच्या पाठीमागील असणाऱ्या भातशेतामध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास दहा फूट लांबीचा, दहा ते बारा किलो वजनाचा मोठा अजगर आढळला. शेतकऱ्यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. मजूर लालासो पाटील व प्राणीमित्र संग्राम कुंभार, अमित माने यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या अजगराला पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडले. अजगर सोडताना वनपाल काशिलिंग बाद्रे , वनरक्षक सुभाष पाटील, सर्पमित्र संग्राम कुंभार, अमित माने आणि वन विभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते. दोन महिन्यांपूर्वीही वारणावती वसाहतीमध्ये असाच मोठा अजगर सापडला होता.अजगराला बघितल्यानंतर शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी गर्दी केली होती..
0 Comments