सांगली जिल्ह्यात ८ विधानसभा मतदार संघात ८५ जणांनी माघार घेतली असल्याने निवडणूक रिंगणात ९९ उमेदवार आहेत.शिराळ्यात केवळ सहा तर तासगाव -कवठेमहांकाळ येथे सर्वाधिक १७ उमेदवार आहेत.
तासगाव: २९ ऑक्टोबर : माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला. त्याची चौकशीची फाईल तयार झाली. त्यावर तत्कालीन गृहमंत्री म्हणून आर. आर. पाटील यांची 'चौकशी करावी' म्हणून सही होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील प्रचार सभेत केला, मी त्यांना मंत्री केले, उपमुख्यमंत्री केले, गृहमंत्री केले, प्रदेशाध्यक्ष केले. मात्र, त्यांनी माझा केसांनी गळा कापला, अशी खदखदही त्यांनी व्यक्त केली.
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला.यावेळी प्रचंड शक्तिप्रदर्शन करून झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.
------------------------------------------
तासगाव: २८ ऑक्टोबर : तासगाव मधून राष्ट्रवादीचे रोहित पाटील, सुमन पाटील,भाजपकडून संजय पाटील, मनसेकडून वैभव कुलकर्णी, दत्तात्रय बामणे, प्रमोद देवकाते, प्रदीप माने, सूरज पाटील, अनिल गावडे, संभाजी पाटील,विक्रांतसिंह पाटील यांनी अर्ज भरला.
तासगाव ,ता. २५ :तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून संजय पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केलेल्या अजितराव घोरपडे यांचे चिरंजीव राजवर्धन यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. संजयकाका २९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करतील.
भाजपचे माजी खासदार संजय पाटील आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अखेर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत हाती 'घड्याळ' बांधले. संजयकाकांना तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून तर निशिकांत यांना इस्लामपूर मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा करण्यात आली. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे चिरंजीव राजवर्धन यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत संजय पाटील आणि निशिकांत पाटील यांनी मुंबईत प्रवेश केला. त्यांना पक्षाचे एबी फॉर्मही सुपुर्द करण्यात आले. संजयकाका आणि निशिकांत हे सोमवारी व मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करतील.
-------------------------------------------------
रोहित पाटील यांनी आज गुरुवारी (ता.२४ )अर्ज दाखल केला.
भाजपचे माजी खासदार संजय पाटील आज गुरुवारी राष्ट्रवादीत (अजितदादा पवार )पक्ष प्रवेश करणार २९ ला अर्ज भरणार. अजितराव घोरपडे यांनी संजय पाटील यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
0 Comments