शिराळा विधानसभा मतदार संघ
सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४ | |||
---|---|---|---|
सांगली | मिरज | तासगाव-कवठेमहांकाळ | खानापूर |
शिराळा | इस्लामपूर | जत | पलूस-कडेगाव |
शिराळा विधानसभा उमेदवार | ||||
---|---|---|---|---|
अ.क्र | उमेदवाराचे नाव | पक्ष | चिन्ह | मतदान |
1 | गौस बाबासो मुजावर | बहुजन समाज पार्टी | हत्ती | 596 |
2 | सत्यजित शिवाजीराव देशमुख |
भारतीय जनता पार्टी | कमळ | 130738 (विजयी) |
3 | मानसिंगभाऊ फत्तेसिंगराव नाईक |
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार |
तुतारी वाजवणारा माणूस |
108049 |
4 | अनिल रंगराव अलूगडे | अपक्ष | ट्रमपेट | 2265 |
5 | जितूभाऊ शिवाजीराव देशमुख | अपक्ष | हिरा | 1066 |
6 | मानसिंग ईश्वरा नाईक | अपक्ष | सायकल पंप |
472 |
अर्ज माघार घेतलेले उमेदवार | ||||
1 | विराज नाईक | अपक्ष | ||
2 | सम्राट शिंदे | अपक्ष | ||
3 | रवी पाटील | अपक्ष | ||
4 | आनंदराव सरनाईक | संभाजी ब्रिगेड | ||
5 | निवास पाटील | अपक्ष | ||
6 | तानाजी पाटील | अपक्ष | ||
7 | प्रवीण पाटील | अपक्ष | ||
8 | सम्राट महाडिक | अपक्ष | ||
9 | तेजस्वी महाडिक | अपक्ष |
सांगली जिल्ह्यात ८ विधानसभा मतदार संघात ८५ जणांनी माघार घेतली असल्याने निवडणूक रिंगणात ९९ उमेदवार आहेत.शिराळ्यात केवळ सहा तर तासगाव -कवठेमहांकाळ येथे सर्वाधिक १७ उमेदवार आहेत.
मतदारसंघ व उमेदवार
मिरज -१४ ,सांगली -१४ ,इस्लामपूर -१२ ,शिराळा -६,पलूस-कडेगाव -११ ,खानापूर -१४ ,तासगाव -कवठेमहांकाळ १७ ,जत -११
शिराळा:३०ऑक्टोबर : शिराळा विधानसभा निवडणुकीसाठी आज झालेल्या छानणीत २४ उमेदवारी अर्जापैकी विराज नाईक यांचा मानसिंगराव नाईक व हणमंतराव पाटील यांचा सत्यजित देशमुख यांना पर्यायी अर्ज असल्याने त्यांचे २ अर्ज अवैध ठरले. यामध्ये चार पक्षीय व ११ अपक्ष असे १५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
अर्ज वैध ठरलेले उमेदवार | ||
---|---|---|
अ.क्र | उमेदवाराचे नाव | पक्ष |
1 | मानसिंगराव नाईक | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार |
2 | सत्यजित देशमुख | भारतीय जनता पार्टी |
3 | आनंदराव सरनाईक | संभाजी ब्रिगेड |
4 | गौस मुजावर | बहुजन समाज पार्टी |
5 | सम्राट महाडिक | अपक्ष |
6 | तेजस्वी महाडिक | अपक्ष |
7 | विराज नाईक | अपक्ष |
8 | अनिल अलूगडे | अपक्ष |
9 | सम्राट शिंदे | अपक्ष |
10 | रवी पाटील | अपक्ष |
11 | जितेंद्र देशमुख | अपक्ष |
12 | निवास पाटील | अपक्ष |
13 | तानाजी पाटील | अपक्ष |
14 | प्रवीण पाटील | अपक्ष |
15 | मानसिंग ईश्वरा नाईक | अपक्ष |
ी
शिराळा :२७ ऑक्टोबर :भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सत्यजित देशमुख आणि मला एकत्रित बसवून उमेदवारी बद्दल निर्णय घ्यायला हवा होता . २०१९ ची विधानसभा निवडणूक झाल्या नंतर मला २०२४ ला शिराळा विधानसभेची तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते.पण ते पाळले नाही.वरती लॉबिंग करायला आमचं चुकलं असं आम्हाला वाटतंय. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांची आम्ही निवडणूक लढवावी अशी इच्छा असल्याचे मत सम्राट महाडिक यांनी व्यक्त केले आहे.
➖➖➖➖➖➖➖
शिराळा:२६ ऑक्टोबर :भाजपा महायुतीचा उमेदवार म्हणून शिराळा विधानसभा मतदार संघातून भाजपची जाहीर होताच सत्यजित देशमुख यांना हार घालून पेढा भरवून जल्लोष करताना शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पृथ्वीसिंह नाईक व इतर कार्यकर्ते
शिराळा,ता.२६:भाजपा महायुतीचा उमेदवार म्हणून शिराळा विधानसभा मतदार संघातून भाजपची उमेदवारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांना जाहीर झाली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी (ता.२८) दुपारी १ वाजता भरणार असून भुईकोट किल्ला येथे भव्य प्रचार सभेचे आयोजन केले असल्याची माहिती भाजपाचे शिराळा मंडल अध्यक्ष हणमंतराव पाटील व वाळवा पश्चिम मंडल भाजपा अध्यक्ष डॉ. सचिन पाटील यांनी दिली.
यावेळी पाटील म्हणाले, सोमवार (ता.२८)दुपारी १ वाजता शिराळा अंबामाता मंदिरा पासून रॅली काढण्यात येणार आहे.ही रॅली अंबामाता मंदिर,सोमवार पेठ,कुरणे गल्ली गुरुवार पेठ,पुल गल्ली,शिराळा बसस्थानक मार्गे,तहसिल कार्यालय, भुईकोट जाईल.उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर भुईकोट किल्ला येथे जाहीर सभा होणार आहे.
यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने,आमदार विनयर कोरे,आमदार सदाभाऊ खोत,भाजपा नेते सम्राट महाडिक,शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील,निशिकांत दादा पाटील,राहुल दादा महाडिक,सी.बी.पाटील,भगतसिंग नाईक,रणजितसिंह नाईक, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवारचा आठवडा बाजार आज रविवारी
शिराळा येथे सोमवारी आठवडा बाजार असतो.मात्र सोमवारी सत्यजित देशमुख रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.त्यामुळे सोमवार ऐवजी उद्या रविवारी बाजार भरवण्यात येणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
शिराळा :२६ ऑक्टोबर : आमदार मानसिंगराव नाईक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी (ता.२९) रोजी सकाळी १० वाजता शिराळ्यात अंबामाता मंदिरापासून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅली मंदिरापासून शिराळा शहरातील प्रमुख मार्गावरून तहसीलदार कार्यालयाकडे जाईल.उमेदवारी अर्ज भरल्या नंतर बाह्यवळण रस्ता येथे सभा होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
शिराळा :२६ ऑक्टोबर :भाजपची उमेदवारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांना जाहीर झाली.
त्यामुळे सत्यजित देशमुख समर्थकांची व कार्यकर्त्यांची उत्कंठता संपली आहे. कार्यकर्त्यांच्या जल्लोषी वातावरण आहे. सध्या तरी शिराळा विधासभा मतदार संघात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्ष अशी लढत होणार असे चित्र आहेत.२९ ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असल्याने अपक्ष म्हणून कोण उभा राहणार का ? याची उत्सुक्ता व चर्चा रंगू लागली आहे.
➖➖➖➖➖➖➖
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार मानसिंगराव नाईक यांना शिराळा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर
शिराळा,ता.२४:शिराळा विधानसभा निवडणुकीसाठी आज गुरुवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी तीन अपक्ष उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.आज अखेर तीन दिवसात १६ व्यक्तींनी ३० नामनिर्देशन अर्जाची खरेदी केली आहे.आज अपक्ष उमेदवार म्हणून अनिल रंगराव अलुगडे ( भाटशिरगाव),सम्राट विजयसिंह शिंदे ( शिराळा),रवी भगवानराव पाटील( सागाव ) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अद्याप प्रमुख राजकीय पक्षाच्या एकाही उमेदवारांनी अर्ज दाखल केले नाहीत.गुरुपुष्य अमृतचा योग साधून तीघांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
पहिल्या दिवशी ९ जणांना १५ अर्जाची विक्री .
दुसऱ्या दिवशी ४ जणांना ८ अर्जाची विक्री झाल्याने दोन दिवसात १३ जणांना २३ अर्जाची विक्री झाली असली तरी दोन दिवसात एक हि अर्ज दाखल नाही.
तिसऱ्या दिवशी तीन अपक्ष अर्ज दाखल .१६ व्यक्तींनी ३० अर्ज खरेदी केले.
---------------------------
मंगळवारी (ता. 29) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार मानसिंगराव नाईक अर्ज भरणार आहेत. सकाळी 10 वाजता शिराळ्यातील अंबामाता मंदिरापासून रॉलीला सुरवात होईल. तहसीलदार कार्यालयात अर्ज भरून नंतर सभा होणार आहे.
-------------------------------
0 Comments