खालील मतदार संघावर क्लिक करून जाणून घ्या त्या त्या मतदारसंघाची माहिती
सांगली जिल्हा ८ विधानसभा निवडणूक २०२४
जिल्ह्यातील कोणत्या मतदार संघात कोणाला किती मते पडली हे खालील तक्त्यावर क्लिक करून वाचा
सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४ | |||
---|---|---|---|
सांगली | मिरज | तासगाव-कवठेमहांकाळ | खानापूर |
शिराळा | इस्लामपूर | जत | पलूस-कडेगाव |
सांगली२३ नोव्हेंबर २०२४ : विधानसभेला सांगली जिल्ह्यात भाजपला शिराळा,मिरज,सांगली,जत,शिवसेना एकनाथ शिंदे गट खानापूर,कॉंग्रेस -कडेगाव तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष इस्लामपूर व तासगाव येथे आपले वर्चस्व स्थापित करता आले.
सांगली :४ नोव्हेंबर २०२४
मिरज,सांगली,खानापूर प्रत्येकी १४ ,इस्लामपूर १२, पलूस-कडेगाव व जत प्रत्येकी ११,शिराळा ६ तर तासगाव-कवठेमहांकाळ १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वात कमी उमेदवार शिराळा ६ तर सर्वाधिक उमेदवार १७ तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघात आहेत.
---------------------------
अपक्षांसाठी आयोगाने ठेवली १९० चिन्हे तयार
सांगली.१ नोव्हेंबर २०२४ :अपक्ष उमेदवारांसाठी १९० चिन्हे निवडणूक आयोगाने दिली आहेत. त्यातील एक चिन्ह मागता येईल. एका चिन्हावर अनेकांनी दावा केल्यास ज्या उमेदवाराने पहिला अर्ज दाखल केला, त्यास किंवा नावांच्या यादीप्रमाणेही चिन्हांचे वाटप केले जाते.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर १८४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीसाठी सोमवारी (ता. ४) दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. माघारीनंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप होईल. राष्ट्रीय, प्रादेशिक पक्षांसह नोंदणीकृत आघाड्यांसाठी निवडणूक चिन्हे
राखीव ठेवलेली असतात. अपक्षांना पंचिंग मशीन, टॉर्च, टेवल लॅम्प, दुर्बिण, अलमारी, बंदूक, गॅस सिलिंडर, जहाज, झुला, स्विच बटन, चाळणी, टिफिन, ऑटो, रेडिओ, इस्त्री , ब्रश, शार्पनर, रिंग, चप्पल, लिफाफा, चमचा, कढई, पतंग, काठी, पर्स, कुकर आदी अनेक चिन्हं आहेत.
-----------------------------------------------------------------
सांगली: ३० ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची काल बुधवारी छाननी झाली. आठ विधानसभा मतदारसंघांतील १९५ उमेदवारांचे २३९अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी नऊ उमेदवारांचे ६४ अर्ज अवैध ठरले.मिरज मतदार संघातील वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे पुतणे अपक्ष राजरत्न आंबेडकर यांचाही अर्ज अवैध ठरला.अर्ज माघारीचा सोमवार (ता. ४) दिवस असून, त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
यांचे अर्ज ठरले वैधभाजप कडून डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, संग्रामसिंह देशमुख, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, रोहित पाटील, वैभव पाटील, काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, पृथ्वीराज पाटील, अपक्ष मोहन वनखंडे, एकनाथ शिंदे शिवसेनेकडून सुहास बाबर, अजितदादा राष्ट्रवादीकडून माजी खासदार संजय पाटील, निशिकांत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे तानाजी सातपुते या राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांचे अर्ज वैध ठरले आहेत.
-----------------------------------------------
१९५ उमेदवारांचे २४९ अर्ज
सांगली:२९ऑक्टोबर : सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत १९५ उमेदवारांचे तब्बल २४९ अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी ११८ जणांनी १२६ अर्ज भरले. अर्जाची छाननी आज (ता. ३०) होणार आहे. मिरजेतून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. तासगाव- कवठेमहांकाळमध्ये माजी खासदार संजय पाटील आणि इस्लामपुरातून निशिकांत पाटील या दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केले. शिराळ्यात आमदार मानसिंगराव नाईक यांनी वाळवा आणि शिराळा येथील नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. सोमवार (ता. ४) माघारीची मुदत आहे.
राजकीय मैदानातील हे आहेत दिग्गज
भाजपकडून डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, संग्रामसिंह देशमुख, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मानसिंगराव नाईक, रोहित पाटील, वैभव पाटील, काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, पृथ्वीराज पाटील, मोहन वनखंडे, एकनाथ शिंदे शिवसेनेकडून सुहास बाबर, अजित पवार राष्ट्रवादीकडून माजी खासदार संजय पाटील, निशिकांत पाटील, शिवसेना ठाकरे गटाकडून तानाजी सातपुते. शिराळा अपक्ष सम्राट महाडिक
मतदारसंघ -उमेदवार -अर्ज असे
मिरज -३०(३९)
सांगली-२५ (३३)
इस्लामपूर-२१ (२३)
शिराळा-१६ (२४)
पलूस-कडेगाव-२०( २४)
खानापूर- आटपाडी-३० (३७)
तासगाव- कवठेमहांकाळ-३६-(४५)
जत-२७-(२४)
२४
२४
मातब्बरांनी शक्तिप्रदर्शनाने भरले उमेदवारी अर्ज
सांगली, ता. २८: जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतून आज ५८ जणांनी ७५ उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात आमदार विश्वजित कदम, गोपीचंद पडळकर यांच्यासह वैभव पाटील, मोहन वनखंडे, सम्राट महाडिक, सत्यजित देशमुख यांचा समावेश आहे. आज (ता. २९) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असून, आमदार मानसिंगराव नाईक ,निशिकांत पाटील, संजय पाटील यांच्यासह अनेक मातब्बर शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरणार आहेत.
संजय पाटील, निशिकांत पाटील अजितदादांच्या राष्ट्रवादीत दाखल
तासगाव ,ता. २५ : भाजपचे माजी खासदार संजय पाटील आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अखेर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत हाती 'घड्याळ' बांधले. संजयकाकांना तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून तर निशिकांत यांना इस्लामपूर मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा करण्यात आली. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे चिरंजीव राजवर्धन यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत संजय पाटील आणि निशिकांत पाटील यांनी मुंबईत प्रवेश केला. त्यांना पक्षाचे एबी फॉर्मही सुपुर्द करण्यात आले. संजयकाका आणि निशिकांत हे सोमवारी व मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करतील.
--------------------------------------
सांगली, ता. २४: विधानसभा निवडणुकीसाठी गुरुपुष्यामृत योग साधत जिल्ह्यातील अठरा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे, सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ, जत मध्ये आमदार विक्रम सावंत यांच्यासह तासगाव मध्ये रोहित पाटील, पलूस कडेगाव संग्रामसिंह देशमुख, इस्लामपूर निशिकांत पाटील,खानापूर मध्ये सुहास बाबर, जतमध्ये प्रकाश जमदाडे यांचा समावेश आहे. अन्य प्रमुख उमेदवार २८ आणि २९ रोजी अर्ज दाखल करणार आहेत.
मुक्त मराठी लघुचित्रपट
-
व्रण मराठी लघुचित्रपट
टमरेल मराठी लघु चित्रपट
-
खराटा मराठी लघु चित्रपट
कहर मराठी लघुचित्रपट
0 Comments