शिराळा,ता.११: संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतुन प्रशासनाने केलेल्या सहकार्यामुळे सात महिन्यात शिराळा तालुक्यातील एक हजार प्रस्ताव मंजुर करण्यात आले असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केदार नलवडे यांनी दिली.
येथे तहसीलदार कार्यालयात तहसिलदार शामल खोत पाटील ,नायब तहसिलदार राजाराम शिद यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी नलवडे म्हणाले, सप्टेंबर महिन्यात दाखल झालेल्या संजय गांधी निराधार योजनेतून २९ , श्रावणबाळ योजनेतून २१ अशा एकुण ५० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना प्रति महिना १५०० रुपये अनुदान बँक खात्यावर जमा होणार आहे .संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विविध योजना, श्रावणबाळ योजनेसह सदस्यांनी प्रभावीपणे एकसंघपणे अंमलबजावणी केली आहे. सर्व सामान्य गरजु विधवा ,महिला कर्करोग , दुर्धर आजार असणारे रुग्ण , दिंव्याग यांची प्रकरणे करत असताना कागदपत्रे तयार करण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन ही प्रकरणे दाखल केली. तहसिलदार शामल खोत- पाटील ,नायब तहसिलदार राजाराम कशिद. संजय गांधी निराधार मधील अधिकारी, कर्मचारी , महसूल, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य करत प्रभावीपणे काम केले .त्यामुळे लाभार्थ्यांना न्याय देता आला. यावेळी सदस्य विजय गराडे-पाटील ,अदिक चरापले ,सारीका पाटील,सुनंदा झिमुर, सुनिल गुरव,गणेश जाधव,सचिन पाटील,महेश पाटील,वसंत सावंत, महसुल सहाय्यक, उत्तम चव्हाण उपस्थित होते.
0 Comments