BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नाना हाती घेणार धनुष्यबाण Nana will take up the bow and arrow


शिराळा,ता.११: माझ नुकसान केल आता माझ्या मुलाचं राजकीय नुकसान  मी  का करू ? मी पक्ष सोडत नाही.मला पक्ष सोडायला भाग पडलं गेलं. हे खर तर माझी पक्षातून हाकल पट्टी केल्यासारखे आहे अशी खंत व्यक्त करत मी  पक्षाला रामराम ठोकत आहे. यासाठी आमच्या नाईक कुटुंबियांचा ही मला पाठींबा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सभापती अॅड. भगतसिंग नाईक यांनी  दिली. शिराळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पृथ्वीसिंह नाईक उपस्थित होते.

   यावेळी ते नाईक म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेवेळचा पहिला शिराळा  तालुकाध्यक्ष होतो. त्या माध्यमातून  घराघरात पक्ष पोहोचवण्याचे काम केले.असे असताना आम्ही पक्षातून कसे बाहेर पडू याचेच जास्त प्रयत्न झालेत. शिराळा येथील गल्लीतील कार्यक्रमात माझ्यासह मुलांना ही बोलावले जात नाही. गत विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार यांच्या प्रचारात माझा  मुलगा पृथ्वीसिंह  हा  अग्रभागी होता.तरी ही नेहमी आमची राजकीय गळचेपी करण्याचा प्रयत्न झाला.आपण शरद पवार गटात असल्याचे विद्यमान आमदारांना  भाषण व डिजिटल लावून सारखे सांगावे लागत आहे. विधानपरिषद निवडणुकीत शेकापचे माजी आमदार  जयंत पाटील यांनी येथील आमदारांनी महाविकास आघाडीला मत दिले नसल्याचे उघडपणे सांगितले होते. त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या शिवाय काही चालत नाही पण अंतरमनातून ते  कोणाकडे आहेत हे सर्वाना माहित आहे. माझे वडील आमदार होते. मग मी  आमदार का होऊ नये ?  प्रत्येक पद तुमच्या घरातच  का ? मी लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने यांचे काम केले. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार धैर्यशील माने सांगतील त्या उमेदवाराचा आम्ही प्रचार करणार.आमची कामे कोणामुळे आडत नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार धैर्यशील माने आम्हाला मदत  करतात.

 भगतसिंग नाईक व त्यांचे दोन सुपुत्र विश्वप्रतापसिंह व पृथ्वीसिंह नाईक हे त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्याच्या समवेत  उद्या (ता.१२ )मुंबई येथे  दसरा मेळाव्यात  शिवसेना एकनाथ  शिंदे गटात प्रवेश करणार आहे.रविवारी पेठ नाका ते शिराळा अशी  भव्य रॅलीचे आयोजन केले आहे. शिराळा शहरातून मिरवणूक काढून  श्री अंबामाता मंदिरात सभा घेणार आहेत.

Post a Comment

0 Comments