मुंबई: ३१ ऑक्टोबर शिरळा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार सम्राट महाडिक यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मनधरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यासाठी बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चार्टर्ड प्लेन पाठवून सम्राट महाडिक व राहुल महाडिक यांना तत्काळ वर्षा बंगल्यावर बोलवून घेतले..यावेळी कार्यकत्यांशी चर्चा करून आम्ही निर्णय देऊ, असे महाडिक बंधूनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल,खासदार सुनील तटकरे, खासदार धनंजय महाडिक, भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याला विचारात घेऊन निर्णय घेऊ, असे सम्राट महाडिक म्हणाले.
मुक्त मराठी लघुचित्रपट
-
व्रण मराठी लघुचित्रपट
टमरेल मराठी लघु चित्रपट
-
खराटा मराठी लघु चित्रपट
कहर मराठी लघुचित्रपट
0 Comments