जिल्ह्यातील कोणत्या मतदार संघात कोणाला किती मते पडली हे खालील तक्त्यावर क्लिक करून वाचा
जत विधानसभा मतदारसंघ
सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४ | |||
---|---|---|---|
सांगली | मिरज | तासगाव-कवठेमहांकाळ | खानापूर |
शिराळा | इस्लामपूर | जत | पलूस-कडेगाव |
जत विधानसभा उमेदवार | ||||
---|---|---|---|---|
अ.क्र | उमेदवाराचे नाव | पक्ष | चिन्ह | मतदान |
1 | तमनगौडा रवीपाटील | अपक्ष | --- | १९,४२० |
2 | गोपीचंद पडळकर | भाजप | -- | १,१३,७३७ (विजयी ) |
3 | विक्रम सावंत | काँग्रेस | -- | ७५,४९७ |
सांगली जिल्ह्यात ८ विधानसभा मतदार संघात ८५ जणांनी माघार घेतली असल्याने निवडणूक रिंगणात ९९ उमेदवार आहेत.शिराळ्यात केवळ सहा तर तासगाव -कवठेमहांकाळ येथे सर्वाधिक १७ उमेदवार आहेत.
मतदारसंघ व उमेदवार
मिरज -१४ ,सांगली -१४ ,इस्लामपूर -१२ ,शिराळा -६,पलूस-कडेगाव -११ ,खानापूर -१४ ,तासगाव -कवठेमहांकाळ १७ ,जत -११
जत विधानसभा उमेदवार | ||||
---|---|---|---|---|
अ.क्र | उमेदवाराचे नाव | पक्ष | चिन्ह | मतदान |
1 | तमनगौडा रवीपाटील | अपक्ष | --- | ---- |
2 | गोपीचंद पडळकर | भाजप | -- | ---- |
3 | विक्रम सावंत | काँग्रेस |
-- | --- |
जत :२६ ऑक्टोबर -:जत विधानसभा मतदारसंघातून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी, तर शिराळा विधानसभा मतदारसंघातून सत्यजित देशमुख यांना उमेदवारी जाहीर भारतीय जनता पार्टीची दुसरी यादी आज जाहीर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
तम्मनगौडा रविपाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
जत: २५ ऑक्टोबर: भाजपचे जत विधानसभा निवडणूकप्रमुख तम्मनगौडा रविपाटील यांनी शुक्रवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. "भाजपने भूमिपुत्र म्हणून उमेदवारी दिली, तर ठीक; अन्यथा अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असून, माझी उमेदवारी ही जत तालुक्याच्या विकासासाठी असेल," अशी भूमिका तम्मनगौडा रविपाटील यांनी व्यक्त केली.
जत विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारीवरून भूमिपुत्र विरुद्ध उपरा असा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. भाजपकडून गोपीचंद पडळकर हे उमेदवारीच्या स्पर्धेत उत्तरल्यामुळे भूमिपुत्रांनी त्यांच्या विरोधात जोरदार उठाव केला आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी भाजपमधून, तर शुक्रवारी जत विधानसभा निवडणूकप्रमुख तम्मनगौडा रविपाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज आज दाखल केले आहेत. भाजप व अपक्ष म्हणूनही दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर पत्रकारांशी बोलताना रविपाटील म्हणाले की, आपण भारतीय जनता पार्टी तसेच अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपने जतमध्ये बाहेरचा उमेदवार लादू नये, अशी आम्ही मागणी केली आहे.
➖➖➖➖➖➖
रिपब्लिकन पक्षाचे संजय कांबळे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला.
जत: २५ ऑक्टोबर : रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांच्या उपस्थित मेळावा घेऊन विधानसभा लढविण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर महायुतीने रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाला कुठेही विश्वासात न घेता जागा वाटपा बद्दल निर्णय घेतले. या अनुषंगाने पक्षाच्या वतीने आज मी उमेदवारी दाखल केली आहे. जत तालुक्यातील जनता पक्षाच्या पाठीशी राहील, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे सहसचिव संजय कांबळे यांनी व्यक्त केला.
➖➖➖➖➖➖➖
सावंत यांना जत मधून कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर
मुक्त मराठी लघुचित्रपट
-
व्रण मराठी लघुचित्रपट
टमरेल मराठी लघु चित्रपट
-
खराटा मराठी लघु चित्रपट
कहर मराठी लघुचित्रपट
0 Comments