शिराळा,ता.२९:विरोधकांचा निनाईदेवी साखर कारखाना दालमिया कधी झाला हे सभासद,शेतकऱ्यांना सुद्धा कळाले नाही.त्या उलट आम्ही संपूर्ण मतदारसंघाचा शेतकरी,सामान्य नागरिकांना विकासाचा केंद्रबिंदू मानून विकासात्मक बदल घडवून आणत असल्याचे मत आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक,जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील,राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील,अमरसिंह नाईक,रणधीर नाईक,विराज नाईक,साम्राटसिंह नाईक,राजेंद्रसिंह नाईक,सुनीतादेवी नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार नाईक म्हणाले,आमच्या संस्थाही अडचणीत होत्या.मात्र त्या आज राज्यात आदर्श ठरत आहेत.मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटतो म्हणून माझ्यावर मुंबईत एक व गावाकडे एक अशी टीका केली जात आहे.राज्याचा मंत्री हा कोणत्या पक्षाचा नसतो.अजितदादा यांनी मला विकास कामांना निधी दिला.मला घरात बसून कोणी निधी दिला नसता.जयंतराव पाटील यांना सर्वोच्च स्थानी बसवायचे आहे.
शिवाजीराव नाईक म्हणाले,विरीधकांनी व्यवहारिक टीका करावी.अवास्तव बोलाल तर आम्ही ही जश्यास तसे उत्तर देऊ.आमदार मानसिंगराव नाईक यांनी सर्व सामाज्याला निधी दिला आहे.या मतदार संघातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी शिराळा औद्योगिक वसाहत मध्ये रोजगार निर्मिती व चांदोली पर्यटन केंद्र विकसित झाले पाहिजे.विकास कामाला आणखी गती मिळावी म्हणून आमदार मानसिंगराव नाईक यांना निवडून द्या.
प्रतीक पाटील म्हणाले,जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदार संघात आमदार मानसिंगराव नाईक यांनी विकास कामांचा डोंगर उभा केला.या मतदारसंघातील जवळपास ८०टक्के विकास कामे केली आहेत.उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी आमदार नाईक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या.
यावेळी महिला तालुकाध्यक्ष साधना पाटीप,काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संदीप जाधव,यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,संचालक शिवाजी पाटील,सुनील तांदळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास अश्विनी नाईक,डॉ शिमोनी नाईक,भूषण नाईक,प्रमोद नाईक,दिनकरराव पाटील,विश्वास कदम,विजयराव नलवडे,महादेव कदम,रणजित पाटील,नेताजी पाटील,लिंबाजी पाटील उपस्थित होते.सूत्रसंचलन विजय लोहार यांनी केले.आभार तालुकाध्यक्ष बी.के.नायकवडी यांनी मानले.
अडीच तास रॅली अन राखरखते ऊन
आमदार मानसिंगराव नाईक यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपास्थिती शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.ही रॅली अंबामात मंदिर,सोमवार पेठ,पोटे चौक,गुरुवारपेठ,देशमुख गल्ली,दत् मंदिर,एसटी बस स्थानक,तहसीलदार कार्यालय या मार्गावर रॅली काढण्यात आली.राखराखत्या उन्हात सभा सुरु असताना महिला व पुरुषांच्यात उत्साह कायम होता.
त्यांना दादांच्या भेटी पेक्षा निधीचं दुःख
विरोधकांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी भेटतो यापेक्षा त्यांच्याकडून विकासासाठी निधी आणतो याचे मोठे दुःख होत आहे.त्यामुळे ते माझ्यावर सतत टीका करतात अशी टीका आमदार नाईक यांनी विरोधकांच्यावर करून त्यांच्या टिकेला उत्तर दिले.
मुक्त मराठी लघुचित्रपट
-
व्रण मराठी लघुचित्रपट
टमरेल मराठी लघु चित्रपट
-
खराटा मराठी लघु चित्रपट
कहर मराठी लघुचित्रपट
0 Comments