जिल्ह्यातील कोणत्या मतदार संघात कोणाला किती मते पडली हे खालील तक्त्यावर क्लिक करून वाचा
इस्लामपूर विधानसभा मतदार संघ
सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४ | |||
---|---|---|---|
सांगली | मिरज | तासगाव-कवठेमहांकाळ | खानापूर |
शिराळा | इस्लामपूर | जत | पलूस-कडेगाव |
इस्लामपूर विधानसभा उमेदवार | ||||
---|---|---|---|---|
अ.क्र | उमेदवाराचे नाव | पक्ष | चिन्ह | मतदान |
1 | जयंतराव पाटील | राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार | तुतारी वाजवणारा माणूस | १,०९.८२९ विजयी |
2 | निशिकांत पाटील | राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा पवार | घड्याळ | ९६,८५२ |
जयंतराव पाटील प्रचार सभा शुभारंभ
मला विरोध झाल्याशिवाय माझे स्पीड वाढत नाही. थोडा विरोध झाल्या शिवाय माझा स्टार्टर लगत नाही.आता त्यांनी येऊन भाषण केले आहे.जे त्यांनी म्हटलं ते मी होऊन दाखवतोच .आमचं पाणी त्यांना.....असूंदे आता लय बोलत नाही .लगेच हे देशभर जात हा प्रॉब्लेम आहे.
आणखी काय म्हणाले जयंतराव पाटील पहा
सांगली जिल्ह्यात ८ विधानसभा मतदार संघात ८५ जणांनी माघार घेतली असल्याने निवडणूक रिंगणात ९९ उमेदवार आहेत.शिराळ्यात केवळ सहा तर तासगाव -कवठेमहांकाळ येथे सर्वाधिक १७ उमेदवार आहेत.
मतदारसंघ व उमेदवार
मिरज -१४ ,सांगली -१४ ,इस्लामपूर -१२ ,शिराळा -६,पलूस-कडेगाव -११ ,खानापूर -१४ ,तासगाव -कवठेमहांकाळ १७ ,जत -११
इस्लामपूर विधानसभा उमेदवार | ||||
---|---|---|---|---|
अ.क्र | उमेदवाराचे नाव | पक्ष | चिन्ह | मतदान |
1 | जयंतराव पाटील | राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार |
तुतारी वाजवणारा माणूस |
--- |
2 | निशिकांत पाटील | राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा पवार |
घड्याळ | ---- |
इस्लामपूर: २९ ऑक्टोबर
सांगलीसह शेजारील जिल्ह्यातील अनेकांना उपद्रव देऊन चांगल्या लोकांची राजकीय कारकीर्द कुजवणाऱ्या जयंत पाटील यांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन अजितदादा पवार यांनी केले.
इस्लामपूर येथे निशिकांत पाटील यांच्या प्राचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.यावेळी "जयंत पाटील यांना मुख्यमंत्रिपद म्हणजे केवळ थापा. लबाडाघरचं आवतण जेवल्याशिवाय खरं नसतं," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंतरावांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेची खिल्ली उडवली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जयंतरावांच्या अर्ज दाखलच्या सभेत याबाबतचे संकेत देणारे भाषण केले होते. त्याकडे लक्ष वेधत त्यांनी जयंतरावांवर निशाणा साधला.
महत्वाची बातमी :२५ ऑक्टोबर २०२४
भाजपच्या निशिकांतदादांच्या हाती घड्याळ
निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांचा राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी मध्ये प्रवेश इस्लामपुर विधानसभा मतदार संघातुन उमेदवारी जाहीर
भाजपा सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला.यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार (दादा) व राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना.सुनिल तटकरेसाहेब यांनी निशिकांत भोसले- पाटील यांचे स्वागत केले .२८३ इस्लामपुर विधानसभा मतदार संघातुन उमेदवारी जाहीर केली.
यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचा अधिकृत एबी फाॅर्म ना.अजित पवार यांच्या हस्ते निशिकांत भोसले- पाटील यांना देण्यात आला. यावेळी या क्षणापासुन इस्लामपुर विधानसभा मतदार संघाच्या सार्वगिण विकासासाठी,जनतेच्या न्याय हक्कासाठी संपुर्ण शक्ती निशिकांतदादांच्या पाठीशी उभी करणार असल्याचे ना.अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी आ.सदाभाऊ खोत,आ.इद्रिसभाई नायकवडी,प्रा.प्रभाकर जमदाडे,वाळवा तालुका राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष केदार पाटील, इंजि.विरेंद्र राजमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी माजी जिल्हा परीषद सदस्य पै.भिमराव माने,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे,युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपाचे सरचिटणीस संदीप सावंत, दादासाहेब रसाळ,इस्लामपुर शहर भाजपाचे उपाध्यक्ष भास्कर मोरे, सयाजी जाधव,युवा मोर्चाचे अध्यक्ष सतेज पाटील व भाजपा पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी भाजपा चे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील,भाजपा वाळवा तालुका अध्यक्ष निवास पाटील,भाजपा वाळवा तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रविण परीट,आष्टा नगरपालिकेचे माजी नगरसेवक मयुर धनवडे,मनोज मगदुम,भाजपाचे शहर अध्यक्ष अशोकराव खोत,सरचिटणीस प्रविण परीट,समीर मुल्ला,अक्षय पाटील,फिरोज मगदुम,रणजीत माने,विश्वजीत पाटील आदिसह अन्य पदाधिकारी उपस्थीत होते.
-----------
२४ ऑक्टोबर २०२४
या निवडणुकीत तुम्हाला सर्व प्रकार बघण्याची संधी मिळेल.अनेकजण दातृत्व दाखवण्यासाठी पुढे येतील. वाम मार्गाचा वापर होईल. देशातील, महाराष्ट्रातील अनेक नेते इथे येऊन मार्गदर्शन करतील. महाराष्ट्रात मोकळेपणाने मी फिरू नये यासाठी अटकाव घालण्याचा प्रयत्न करतील. शेवटच्या चार दिवसात सर्व काही मोकळं सोडण्याचा प्रयत्न होईल.त्यामुळे तुम्ही सर्वांनी सावध रहा. ज्यादा आत्मविश्वास निवडणुकीत आणि लढाईत कधीच बाळगायचा नसतो.
आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावर आणि पक्षातील प्रमुख नेत्यांवर सर्व जबाबदारी टाकलेली आहे. उमेदवारी देतानाही अनेक चाळण्या आम्ही लावत आहोत. या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे राजकारण बदललेले दिसून येईल.असंख्य प्रश्न आज आ वासून उभे आहेत. संविधानाच्या संरक्षणाचा मुद्दा आजही कायम आहे. त्यामुळे तुमचं मत हे आरक्षण वाचवण्यासाठी सुद्धा आहे आणि देशातील सर्व धर्म जातींना संरक्षण देण्यासाठी देखील आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आयुष्य झोकून देत कार्य केले. यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्थान महाराष्ट्रात मोठं आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार यशवंतराव चव्हाण साहेबांनी पुढे नेण्याचं कार्य केलं. आता हे कार्य आदरणीय शरद पवार साहेब करत आहेत. लढाई ही तत्त्वाची असते. सत्तेत जाऊन बसायला खरं तर काही अवघड नव्हतं. मात्र फक्त सत्ता आणि त्यातून निर्माण होणारी संपत्ती हे तात्पुरतं बरं असतं. मात्र वाळव्याच्या स्वाभिमानी जनतेला हे रुचलं नसतं. कोणापुढेही मान न झुकवणारा हा माणूस वाळव्याच्या मातीतला आहे. महाराष्ट्राची सत्ता उखडून काढण्यासाठी तुम्हा सर्वांच्या ताकदीने मी पुढाकार घेतला आहे.तुमच्या विचारांचं, तुमच्या भावनेचं प्रतीक म्हणून मी आज इथे उभा आहे. माझ्या जुन्या सहकाऱ्यांची मला भक्कम साथ आहे. स्वर्गीय राजारामबापू यांच्या निधनानंतर मला राजकारणाचे धडे शिकवणारे अनेक सहकारी भेटले. स्वतः मागे राहून इतरांना पुढे करणारे हे सहकारी महाराष्ट्रात कुठल्याही मतदारसंघात पाहता येणार नाहीत. बापूंचा मुलगा मोठा झाला पाहिजे हा आग्रह त्यांनी ठेवला. त्या सर्वांचे आशीर्वाद आज माझ्यासोबत आहेत.
मुक्त मराठी लघुचित्रपट
-
व्रण मराठी लघुचित्रपट
टमरेल मराठी लघु चित्रपट
-
खराटा मराठी लघु चित्रपट
कहर मराठी लघुचित्रपट
0 Comments