BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

म्हणून दलितांच्यात असुरक्षिततेची भावना - डॉ.सुधाकर वायदंडेHence the feeling of insecurity among Dalits - Dr. Sudhakar Waydande

 


  शिराळा येथे दलित महासंघाची (वायदंडे गट) निषेध परिषद संपन्न 

शिराळा,ता.१४:चुकीच्या पद्धतीने दलित व अल्पसंख्यांक समाजाला धमक्या देणाऱ्या लोकांना पाठीशी घालून लोकशाही पायदळी तुडवण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे दलित,अल्पसंख्यांक लोकामध्ये व महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचा आरोप दलित महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर वायदंडे यांनी केला.

   शिराळा येथे दलित महासंघाच्या (वायदंडे गट)वतीने घेण्यात आलेल्या निषेध परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. राज्यात व देशात दलित लोकांवर व महिलांवर सातत्याने वाढत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या (वायदंडे गट)वतीने शिराळा येथे निषेध परिषद घेण्यात आली.कार्यक्रमाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार)जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे, सदाभाऊ चांदणे,अशोकराव गायकवाड,  शशिकांत नांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            यावेळी  वायदंडे म्हणाले, देशात तसेच राज्यामधील अनेक जिल्ह्यामध्ये अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. काही ठिकाणी आरोपी मोकाट आहेत.अन्याय अत्याचार रोखण्याची जबादारी केंद्र व राज्य सरकारची असताना त्यात ते सपशेल अपयशी ठरलेले आहे. परिणामी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याचा धाक राहिला आहे का हा प्रश्नच आहे?सरकार मधील काही खासदार आमदार,मंत्री उघडपणे जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य करत आहेत .त्यांच्या वरती कोणतीही कारवाई होत नाही. या सर्व अत्याचाराच्या घटनाबाबत निषेध म्हणून व सरकाने केवळ बघ्याची भूमिका न घेता ठोस भूमिका घ्यावी यासाठी दलित महासंघाच्या वतीने विविध ठिकाणी आक्रोश मोर्चे काढण्यात येणार आहेत.          

 देवराज पाटील म्हणाले,दलित अत्याचारांच्या घटना वाढत असताना दलित महासंघाने आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून जो आवाज उठवल्या मुळे समाजाची ताकद दिसून आलेली आहे.

 अरुण कांबळे म्हणाले,पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात दलित व अल्पसंख्यांक समाजामध्ये भीतीचे वातावरण होणे ही लाजिरवाणी बाब आहे.सुनिल मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.     

  यावेळी  दादासाहेब गायकवाड, नागनाथ घाटगे,सागर लोंढे, प्रमोद दबडे, गुलाब सय्यद, सत्कारसिंह गायकवाड,सुजित वारे, जितेंद्र काळे, टारझन पवार, राकेश काळे उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक योगेश वारे यांनी केले. आभार प्रभाकर तांबीरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments